धक्कादायक ! छत्तीसगडमधील ‘कोरिया’त 5 वर्षाच्या मुलीवर भावासमोरच बलात्कार, अल्पवयीन संशयित आरोपी अटकेत

रायपूर  : पोलीसनामा ऑनलाइन –  छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात एका १७ वर्षीय (अल्पवयीन) संशयित आरोपीने अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडल्याची समोर आले आहे. या घटनेनंतर संशयित आरोपीने मुलीला विहिरीत फेकून दिले. तिच्या अंगावर चावा घेतलेल्या जखमा आढळल्या आहेत. एवढंच नव्हे तर तिच्या सहा वर्षाच्या चुलत भावाचीही गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीला अटक केली आहे.

१७ वर्षीय (अल्पवयीन) संशयित आरोपीने पाच वर्षीय चिमुकलीवर तिच्या सहा वर्षाच्या भावासमोर बलात्कार केला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या अंगाला चावा घेतला. त्याच्या जखमा तिच्या शरीरावर आढळल्या. त्यानंतर तिला एका विहिरीत फेकून दिले. आपल्याला पोलीस पकडतील, या भीतीने बलात्कारावेळी समोर असलेल्या मुलीच्या सहा वर्षाच्या चुलत भावाला गळा आवळला. त्यानंतर झुडपात त्याचा मृतदेह फेकला.

पाच वर्षाच्या मुलीला पोहता येत असल्याने ती बुडाली नाही. ती बराच वेळ पाण्यात पोहत राहिली, ती रडत होती. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. विहिरीच्या बाजूने जाणाऱ्या एका तरुणाने मुलीच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यानं विहिरीत पाहिले. त्याने विहिरीत उडी मारून मुलीला वाचवले. त्यानंतर या भयानक घटनेचा पर्दाफाश झाला.

पाच वर्षांची मुलगी आपल्या सहा वर्षाच्या चुलत भावासोबत शेतात खेळत होती. त्याचवेळी शेजारच्या गावातील शंकरगढ येथील एक १७ वर्षीय मुलगा त्यांच्याजवळ गेला. त्याने दोघांशी ओळख वाढवली. दोघांना त्याने शेतावर पूजेसाठी फुलं गोळा करण्यासाठी घेऊन गेला. त्यानंतर अडीच किलोमीटरवर असलेल्या जंगलात घेऊन गेला. तेथे नेल्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर आरोपीने मुलीला जवळच्याच एका खोल विहिरीत फेकले. मुलीला विहिरीतून बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्या संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like