धक्कादायक ! सार्वजनिक ठिकाणी शिंकले म्हणून तोडले पोलिसांचे नाक

अहमदाबाद : वृत्तसंस्था – कामानिमित्त विभागीय कार्यालयात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी शिंकले म्हणून पाच जणांनी मारहाण करत नाक तोंडल्याची घटना घडली. युवराज सिंह झाला असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या मारहाणीत युवराज सिंह झाला यांच्या नाकाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी भारत भारवाड, विपुल भारवाड, संजय भारवाड, रवि भारवाड आणि जगदीश भारवांड या पाच जणांनविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अधिक की, नरोदा येथे राहणारा युवराज सिंह झाला या २६ वर्षीय युवकाची पोस्टिंग कृष्णानगर पोलीस ठाण्यात झाली होती. झाला हा अकाऊंट विभागात कार्यरत असून कामानिमित्त तो विभागीय कार्यालयात गेला होता. काम संपल्यानंतर तो ऑफिसमधून बाहेर निघाला तेव्हा पायऱ्यांवरून तो उतरत असताना त्याला अचानक शिंक आली, त्यानंतर जवळ उभे असणाऱ्या दोन लोकांनी यावरून त्याच्यासोबत वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.

दरम्यान झाला ने या युवकांना आपण पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितल्यानंतर युवक आणखी भडकले त्यांनी आपल्या ३ साथीदारांना बोलावून घेतलं, त्यानंतर या ५ जणांनी मिळून युवराज सिंह झालाला प्रचंड मारहाण केली. या सर्व प्रकारामुळे विभागीय कार्यालयात एकच खळबळ उडाली. उपस्थित लोकांनी या युवकांच्या तावडीतून पोलिसाला कसतरी वाचवलं. या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, .