रत्नागिरीच्या 60 भाविकांना जेवणातून ‘विषबाधा’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सुमारे ६० भाविकांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर पंढरपूर येथील संसर्गजन्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

संगमेश्वर येथील भाविक एकादशी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला आले. ते धुंडा महाराज मठाशेजारील इनामदार वाडा येथे उतरले आहेत. एकादशी असल्याने त्यांनी शुक्रवारी उपवासाचे पदार्थ खाल्ले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यातील ५० ते ६० भाविकांना उलट्या जुलाब सुरु झाले. त्या सर्व भाविकांना नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like