Coronavirus : ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ‘नाम’ने दिला 1 कोटीचा निधी

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने कोरोनाशी लढण्यासाठी नामच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपये पाठवणार आहोत असे स्पष्ट केले आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

नमस्कार मी नाना पाटेकर, या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या आपत्तीशी सरकार एकटे नाही लढू शकणार. आपण आपआपला वाटा उचलायला हवा. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी 50 लाख पाठवणार आहोत. तुम्हीही तुमचा वाटा उचलाल याची खात्री आहे. कृपया घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणे ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे. या क्षणाला. एवढी मेहरबानी करा.

महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय पंतपृधान व उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन पृत्येकी 50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. त्यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 220 झाली आहे. तर देशातले रुग्ण 1 हजारांवर गेले आहेत. संपूर्ण देश लॉकडाउन आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वारंवार घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. देशभरात करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. संचारबंदी आणि लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.