ज्येष्ठ नागरिकाला मागितली ५० हजारांची खंडणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुझ्या खोल्या भाड्याने दिल्या आहेत, म्हणून मला ५० हजार रुपयांची खंडणी देत नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी एका ज्येष्ठ नागरिकाला धमकी देण्याचा प्रकार आळंदीमध्ये घडला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दिगंबर ऊर्फ दिग्या विठ्ठल कदम (रा. गोपाळपुरा, आळंदी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रामदास वामन बनसोडे (वय ६३, रा. कृष्णमंदिरासमोर, गोपाळपुरा, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे.

दिग्या कदम हा मंगळवारी सकाळी बनसोडे यांच्या घरी गेला. त्यावेळी बनसोडे व त्यांची पत्नी विजया घरात होते. दिग्याने जबरदस्तीने घुसून त्यांना धमकावले. तुझ्या खोल्या भाड्याने आहेत. तू मला ५० हजार रुपये दे किंवा दर महिन्याला ३ हजार रुपये हप्ता दे नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन बनसोडे यांच्या तोंडावर चापटी मारल्या.

तुझा भाडेकरु सुनिल चेके तुझा खून करणार आहे. त्याचे सोबत गाडीवर फिरु नकोस, असा त्यांना निरोप दिला. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

You might also like