गवळी कुटूंबियांच्या शेतातील 50 टन चारा जळून खाक ; लाखोंचे नुकसान

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहराजवळील 18 कि.मी.अंतरावरील मोरशेवडी गावातील गवळी भांवडातील शेतातील जनावरांसाठी लागणारा चारा अंदाजे 50 ते 100 टन चारा जळुन खाक झाला.यात अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

धुळे तालुक्यातील मोरशेवडी गावा जवळ तारेचे कंपाऊंड मध्ये 1) गजानन लक्ष्मण गवळी. 2 ) किसन लक्ष्मण गवळी.दोघे गवळी भावंडानी मोकळ्या जागेत जनावरांसाठी लागणारा चारा साठवण केला होता.

आज मंगळवारी सायंकाळी कंपाऊड मध्ये साठवून ठेवलेल्या चाऱ्याने संद्याकाळी साडेसात वाजता अचानक पेट घेतला कोरडा चारा व वारगी यामुळे चाऱ्याने पेट घेत आगीचे मोठे रौद्ररुप धारण केले.ग्रामस्थांनी आगीवर पाणी मारा करायचा प्रयत्न केला.पण तो तोडकचा.

धुळे मनपा अग्निशामक कार्यालयात आगी बाबत माहिती देण्यात आली.माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी तुषार ढाके,अमोल सोनवणे हे मोरशेवडी गावात दोन बंब घेऊन घटनास्थळी रवाना झाले.50/100 टन चारा पेटला आगीचे लोण वाढले ग्रामस्थ आरडा आेरड करत गवळी कुटूंबियाच्या मदतीला धावले.काही चारावर मातीचा मारा करत होते तर काही पाणी फेकत होते.यावेळी मदतसाठी मनपाचे दोन बंब दाखल झाले.त्यांनी पाणी मारा करत दिड तासांन नंतर आग अटोक्यात आली. आगीबाबत राञी उशीरा पर्यत तालूका पोलीस स्टेशनला अग्नि उपद्रव 3/7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.