महावितरण उभारणार ५०० वाहन चार्जिंग केंद्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. या गोष्टींवर उपाय तसेच ई-वाहनांना प्रोत्साहन म्हणून आता महाराष्ट्रात ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. महावितरणद्वारे ही केंद्रे उभारण्यात येणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल,नागपूर या ठिकाणी महावितरणतर्फे सदर प्रकल्प टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a525640f-c8a5-11e8-81bd-cbff2c4043a2′]

सरकारने ‘स्वतंत्र इलेक्ट्रीक व्हेहिकल प्रोत्साहनपर धोरण २०१८’ तयार केले असून याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी (मुंबई-४, ठाणे-६, नवी मुंबई-४, पनवेल-४, पुणे-१०, मुंबई-पुणे महामार्ग-१२ आणि नागपूर-१०) विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत. महावितरणतर्फे सदर प्रकल्प टप्प्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असून आठवडयाभरात वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रांत प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B0757K3MSX,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’815138aa-c8a6-11e8-8a2c-2b76fd6c1c5d’]

विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत उभारण्यात येणार आहेत. तसेच तेथे विद्युत वाहन चार्जिंग केंद्र हे फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असणार आहेत. या केंद्रात एका विद्युत वाहनास पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटं ते एक तास एवढा कालावधी लागणार आहे. विद्युत वाहन चालकांना प्रती युनिट ६ रुपये दर टीओडी तत्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येणार आहे. तसेच रात्री १० ते पहाटे ६ या कालावधीमध्ये वीज दरामध्ये १ रुपया ५० पैसे एवढी सुटही देण्यात येणार आहे.

एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला अंदाजे २ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई वगळता राज्यात विजेचा पुरवठा महावितरण करीत असल्याने महावितरणने राज्यात विविध ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B071JWBFDT,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b391444-c8a6-11e8-96b7-e78982cdfbdf’]