अबब  ५०० किलोग्रॅमचा जिवंत बॉम्ब सापडला अन… एकच खळबळ उडाली … !

जर्मनी: वृत्तसंस्था

‘बॉम्ब ‘असा जरी शब्द कोणी उच्च्चाराला  तरी अनेकांची भांबेरी  उडते. जर्मनीतील फ्रॉकफुर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने टाकलेला जिवंत बॉम्ब सापडला आणि एकच खळबळ उडाली. असा थरकाप उडवणारा अनुभव एक दोन नव्हे तर तब्बल १८ हजार पेक्षा जास्त लोकांनी घेतला.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7da2d7d0-a9ec-11e8-9599-e170c7a79bcf’]

 दुसरे महायुद्ध होऊन जवळपास ७० वर्षे झाली आहेत . पण जर्मनी आणि फ्रान्समध्ये युद्ध काळात वापरण्यात आलेले जिवंत बॉम्ब सापडतात . इथे आशा प्रकारचे जीवनात बॉम्ब सापडणे ही सामान्य बाब  असली तरी अशा घटनांमुळे  भीतीचे वातावरण तयार झाले आहे .

जर्मनीच्या नाशक पथकाने रविवारी दुसऱ्या महायुद्धातील एक विशाल बॉम्ब डिफ्यूज केला. पण यासाठी त्या परिसरातील १८ हजार ५०० लोकांना त्यांचे घर सोडावे लागले. आठवड्यापूर्वी सापडलेला बॉम्ब पथकाने रविवारी डिफ्यूज केला. बॉम्ब सापडल्यानंतर प्रशासनाने सर्वांना रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर डिफ्यूजिंग ऑपरेशन सुरु झाले.

जर्मनीमध्ये सापडलेल्या ५००  किलोग्रॅम बॉम्बच्या आधी फ्रान्समधील नॉरमॅडी भागात एप्रिल महिन्यात २२० किलोचा बॉम्ब सापडला होता. तर फ्रॉकफुर्टमध्ये गेल्या वर्षी १.८ टनाचा बॉम्ब सापडला होता. तो बॉम्ब इंग्लंडने दुसऱ्या महायुद्धात टाकला होता. तेव्हा ६० हजार लोकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले होते.