५०० नवीन बसेस एसटी महामंडळ खरेदी करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५०० नवीन बसेस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B078BNQ313,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3041d03c-b24f-11e8-9a11-1df67fa03d9d’]
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एसटी बसमधून प्रवास करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळाने ही पुढाकार घेऊन एस.टी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.

या बैठकीत वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गूस, भद्रावती, राजुरा, चिमूर बस स्थानकांच्या कामांचाही आढावा घेतला. तसेच, वर्धा, देवळी, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गुस, भद्रावती, राजुरा चिमूर बसस्थानकाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चंद्रूपर, मूल, बल्लारपूर बस स्थानकांच्या कामाचे कार्यादेश ही देण्यात आले आहेत. यासंदर्भात अर्थमंत्री म्हणाले, उर्वरित स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात यावी, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत त्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाचे काम वेळेत आणि चांगल्या दर्जाची करून घेण्यात यावीत.

जाहिरात