500 Rupees Fake Note Update | 500 च्या बनावट नोटांबाबत आली मोठी अपडेट! जाणून घ्या अन्यथा तुम्हाला लागू शकतो ‘चूना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 500 Rupees Fake Note Update | सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन 500 च्या नोटांमधील फरक सांगितला जात आहे. मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, 500 ती नोट बनावट आहे जिच्यात हिरवी पट्टी आरबीआय (RBI) गव्हर्नरच्या सहीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही येथे 500 च्या या बनावट नोटेचे सत्य सांगणार आहोत. (500 Rupees Fake Note Update)

काय आहे या मेसेजचे सत्य?
पीआयबी फॅक्ट चेकनुसार (PIB Fact Check) हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. दोन्ही प्रकारच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत. त्यामुळे याबाबतीत कोणत्याही प्रकारे संभ्रमात राहू नका. पीआयबी फॅक्ट चेकने त्याच्या सोशल अकाउंटवर त्याच्याशी संबंधित लिंक देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये आरबीआयने संबंधित माहिती दिली आहे.

 

500 ची नोट अशी ओळखा
आरबीआयने पैसे बोलता है साईट – https://paisaboltahai.rbi.org.in/pdf/Rs500%20Currency%20Note_Eng_05022019.pdf. वर ही 500 ची नोट ओळखण्यासाठी 17 पॉईंट दिले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही 500 ची नोट सहज ओळखू शकाल. (500 Rupees Fake Note Update)

1. नोट उजेडात धरली असता 500 लिहिलेले दिसेल.

2. डोळ्यांसमोर 45 डिग्रीच्या अँगलमध्ये ठेवल्यास येथे 500 लिहिलेले दिसेल.

3. देवनागरीमध्ये 500 लिहिलेले दिसेल.

4. जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या छायाचित्राचे ओरिएंटेशन आणि पोझिशन थोडी वेगळी आहे.

5. भारत आणि इंडिया अक्षरे लिहिलेली आहेत.

6. नोट थोडी दुमडल्यास सिक्युरिटी थ्रेडचा कलर हिरव्यातून निळा होतो.

7. जुन्या नोटांच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सिग्नेचर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डावीकडे शिफ्ट झाला आहे.

8. येथे महात्मा गांधींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क आहे.

9. वर सर्वात डीवकडे आणि खाली सर्वात उजवीकडे लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

10. येथे लिहिलेला नंबर 500 चा रंग बदलतो. याचा कलर हिरव्यातून निळा होतो.

11. डावीकडे अशोक स्तंभ आहे.

12. डावीकडे सर्कल बॉक्स ज्यामध्ये 500 लिहिलेले आहे. डावीकडे आणि उजवीकडे 5 ब्लीड लाईन्स आहेत, ज्या खडबडीत आहेत.

13. नोटेच्या प्रिंटिंगचे वर्ष लिहिलेले आहे.

14. स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो.

15. मध्यवर्ती भागाकडे लँग्वेज पॅनल.

16. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे छायाचित्र.

17. देवनागरीत 500 लिहिलेले आहे.

भारतीय चलनावर दृष्टिहीन लोकांसाठी काही विशेष ओळखचिन्ह आहेत, जे ते स्पर्शाने ओळखू शकतात. 500 रुपयांच्या नोटेवर अशोक स्तंभाचे प्रतीक, महात्मा गांधींचे चित्र, ब्लीड लाइन आणि खडबडीत ओळख चिन्ह आहेत. जे दृष्टिहीन व्यक्तीला स्पर्शाने जाणवू शकते.

 

Web Title :- 500 Rupees Fake Note Update | 500 rupees fake note updae is there a fake note of 500 in your pocket can identify like this pib fact check

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bad Habits | विषासमान आहेत तुमच्या सकाळीच्या ‘या’ 5 सवयी, लवकर बदला; अन्यथा होऊ शकता त्रस्त

 

Blood Sugar | डायबिटीजमध्ये खजूर खाणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? जाणून घ्या सत्य

 

Pune Crime | लॉजमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची सुटका