शनिवारी 5 हजार जैन बांधव करणार नवकार मंत्राचा जप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल मंडई मंडळाच्या 126 व्या वर्षानिमित्त भव्य तीर्थंकर जैन मंदिरात यंदा शारदा गजानन विराजमान झाले आहेत. सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी यंदा जैन बांधवांना गणेशोत्सवात सहभागी करुन घेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. शनिवारी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता 5 हजार जैन बांधव एकत्र येत विश्व शांतीसाठी नवकार मंत्राचा जप करणार आहेत. यावेळी आचार्य भगवंत श्री विश्वरत्न सागर सूरीश्वरजी महाराज उपस्थित राहणार आहेत.

जैन आणि राजस्थानी शैलीत भव्य जैन मंदिर यंदा साकारण्यात आले असून मंदिराची प्रतिकृती 60 बाय 80 फूट आहे. यामध्ये 15 फूट भगवान महावीरांची भव्य मूर्ती असून त्यासोबतच 24 तीर्थंकरांची शिल्पे गाभाजयात आहेत. जगातील सर्वात प्राचीन संस्कृतमध्ये जैन धर्म हा ऋग्वेदिक संस्कृती मानली जाते. या संस्कृतीचे दर्शन मंडई गणपतीच्या देखाव्यात साकारण्यात आले आहे. जैन संस्कृतीमध्ये तीर्थंकारांचे विशेष महत्व आहे. देखाव्यातून अनेकांना जैन धर्मातील परंपरा, संस्कृती आणि भगवान महावीर यांची महती सांगण्यात आली आहे.