Pune : मोदी सरकारच्या 7 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सेवाकार्य दिन’, 5 हजार कर्यकर्ते सहभागी होणार; कोरोना जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या केंद्र सरकारला येत्या 30 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाजपच्या( bjp ) वतीने पुणे शहरातील 42 प्रभागांमध्ये ‘सेवाकार्य दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील 5 हजार भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. यावेळी कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन कोणताही उत्सव होणार नाही, असेही मुळीक यांनी सांगितले.

Corona Vaccination : ‘कोरोना’मुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष?

जगदीश मुळीक यांनी सांगितले की, शहरातील महापालिकेच्या 42 प्रभाग आणि पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांत 200 हून अधिक सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाविषयी जनजागृती, आरोग्य शिबिरे आणि गरजूंना मदत करण्यात येणार आहे. शहरातील भाजपचे bjp सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह शहर भाजपचे 5 हजार कार्यकर्ते या ‘सेवाकार्य दिन’ मध्ये सहभागी होणार आहेत. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करुन आणि प्रशासनाला सहकार्य करुन हा उपक्रम होईल.

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

भाजपच्या महिला मोर्चा, किसान मोर्चा, युवा मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते 30 तारखेला रक्तदान शिबीरांचे आयोजन करणार आहेत. आरोग्य शिबिरे, कोरोना लसीकरण, म्युकरमायकसिस जनजागृती, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, ऑक्सिमीटर आणि इतर सेवा दिल्या जाणार असल्याची माहिती मुळीक यांनी दिली.

Booster Dose : नव्या संशोधनानुसार खुलासा ! Covid लसीचे 2 डोस घेतल्यानंर आता ‘बुस्टर’ डोसही घेणं आवश्यक ?

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली.

READ ALSO THIS

WhatsApp वर तीन रेड टिकचा काय आहे अर्थ? सरकार तुमच्यावर ठेवणार का लक्ष?, जाणून घ्या

सर्चचा sex education कार्यक्रम आता YouTube वर देखील उपलब्ध, संचालिका डॉ. राणी बंग करणार मार्गदर्शन

हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा होईल इंजिनियरिंगचे शिक्षण, एआयसीटीईने (AICTE) दिली परवानगी