‘वंदे भारत’ रेल्वेत खराब अन्न पुरवणाऱ्या ‘लँड मार्क’ हॉटेलला ५० हजार रुपये दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी वंदे भारत या रेल्वेमध्ये सडलेले अन्न पुरवण्यात आल्यामुळे बराच वादंग उठला होता. याबाबत प्रवाशांसह रेल्वेने प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांनी देखील सडलेले अन्न दिल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. याची दखल घेऊन रेल्वेने कारवाई करत वंदे भारत या रेल्वेला अन्न सप्लाय करणाऱ्या फाइव स्टार हॉटेलला दंड ठोठावण्यात आला आहे. वंदे भारत या रेल्वेला रेल्वेची शान म्हण्यात येते. खूद्द पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली होती.land

रविवार 9 जूनला वाराणसीहून दिल्लीला प्रवास करणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांनी सडलेले अन्न मिळल्यामुळे तक्रार दाखल केली होती. हे अन्न कानपुरमध्ये प्रवाशांना देण्यात आले होते. हे अन्न सडलेले असल्याची तक्रार प्रवाशांसह खासदार आणि मंत्री असलेले साध्वी निरंजन ज्योति याचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये पुरवण्यात येणारे अन्न कानपूरमधील फाईव स्टार हॉटेल लँड मार्क मधून सप्लाय होते.

आयआरसीटीसी मधून अन्न पुरवणाऱ्या या लँड मार्क हॉटेलला ५० हजार रुपये दंड ठोठवण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की याबाबत ९ जूनला तक्ररी मिळाल्या होत्या.

एसी नसलेल्या गाडीतून अन्न पुरवठा केल्याने अन्न सडू शकते –

आयआरसीटीसीचे समूह महाप्रबंधक राजेश कुमार यांनी सांगितले की, आयआरसीटीसी (उत्तर) च्या समूहाचे महाप्रबंधक, हॉटेलचे जेवण तयार करणे आणि त्याची पँकेजिग करणे या सर्व बाबीचे निरिक्षण करतात. जर एसी नसलेल्या वाहनातून जेवण पाठवण्यात येत असेल तर ही समस्या निर्माण होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

 

 

You might also like