अबब ! पुणे विभागातून झाला ५१ हजार कोटींचा प्राप्तिकर जमा.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरातील पाच जिल्ह्यांमधून यंदा ५१ हजार ६०० कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षांत पुणे विभागातून नवे ८ लाख करदाते जोडले गेले विभागातून हा कर जमा करणाऱ्यांमध्ये पुणे विभाग हा पाचवा ठरला आहे. प्राप्तीकर विभागाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमादरम्यान कामगिरीचा आढावा घेण्यात आला.

प्राप्तिकर, कस्टम वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागातील अधिकारी या दोन दिवसीय महोत्सवात विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करणार आहेत. पुणे विभागाचे मुख्य प्राप्तीकर आयुक्त आशु जैन, कस्टम आणि जीएसटीचे मुख्य आयुक्त व्ही. एस. राव आणि कथ्थक नृत्यांग मनीषा साठे, प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि महाराष्ट्र, गुजरात, गोवा येथील अधिकारी या वेळी उपस्थित होते. थेट करामध्ये गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे.

देशात २०१३-१४ मध्ये ६.३८ लाख कोटी रुपयांचा महसूल थेट कराद्वारे जमा होत होता. त्यात यावर्षी नव्याने वाढलेल्या करदात्यांमुळे १२ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशपातळीवर करदात्यांच्या संख्येतही ३.७९ कोटींवरुन ६.८५ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. पुणे विभागामध्ये करदात्यांच्या संख्येत ८ लाखांनी वाढ झाली असून, कर वसुलीचे प्रमाणे ५१ हजार ६०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. करदात्यांच्या संख्येत वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीने करदात्यांसाठी ई असेसमेंट आणि ई रिटर्न भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांत तब्बल ९५ टक्के करदात्यांची पडताळणी इलेक्ट्रॉनिकली करण्यात आली असून, ९९ टक्के करदात्यांचे अर्ज आॅनलाईन भरण्यात आले आहेत.

या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़. या कंपनीने हे काम दुसºया एका कंपनीला दिले होते़. त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटीने हे एसएमएस पाठविण्यात आले़ त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़ होता
तसाच त्यांचा हेतू होता का याबाबत अधिक तपास करत आहोत़. त्याचा काही गैर हेतू होता का याची पडताळणी केली जात आहे़.