51 वर्षांपूर्वी ‘या’ 106 वस्तू आर्मस्ट्राँग आणि एल्ड्रिन चंद्रावर आले होते सोडून, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  माणसाला प्रथम चंद्रावर पोहचवणार्‍या अपोलो मिशन 11 ला आज 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 जुलैला मिशनवर गेलेले अंतराळयान अपोलो-11 चार दिवसानंतर चंद्रावर पोहचल्यानंतर 24 जुलै 1969 ला परत पृथ्वीवर आले. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का, चंद्रावर उतरणार्‍या दोन अंतराळ प्रवाशांनी येताना किती सामान त्याच ठिकाणी सोडले होते आणि त्यांनी चंद्राच्या धरतीवर किती तास घालवले होते. तेव्हा जाणून घ्या त्या 106 वस्तूंची यादी, ज्या चंद्रावरून परतताना नील आर्मस्ट्राँग आणि एल्ड्रिन तेथेच सोडून आले.

मिशनशी संबंधीत काही रंजक गोष्टी
जो अमेरिकन झेंडा नील आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर रोवला होता, तो काही वेळातच पडला. कारण तेथील कठिण परिस्थितीत त्याचे टिकणे अवघड होते. जेव्हा नील ऑर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन चंद्राच्या जमीनीवर उतरले तेव्हा त्यांनी प्रथम गमावले ते होते कम्युनियन वेफर.

चंद्रावर पोहचल्यानंतर हे होते पहिले बोललेले शब्द
चंद्रावर पोहचल्यानंतर प्रथम जे शब्द बोलले गेले ते नंतर संपूर्ण जगात खास लोकप्रिय झाले. पहिले दोन शब्द बज एल्ड्रिन बोलले होते…कॉन्टॅक्ट लाइट. चंद्राच्या पृष्ठभागावरून परत आपले विमान ईगलवर आल्यानंतर त्यांच्या स्पेस सूटमध्ये चंद्रावरील माती होती. त्यांनी 2009 मध्ये ही आठवण व्यक्त करताना म्हटले होते की, मातीतून एक वेगळ्या प्रकारचा वास येत होता, जो गन पावडरसारखा होता, जो वास आतषबाजी नंतर येतो.

ते या वस्तू चंद्रावर सोडून आले
दोघे अंतराळ प्रवासी एकुण 106 वस्तू चंद्रावर सोडून आले होते, त्याची यादी येथे आहे. यामध्ये ते काही सामान एकापेक्षा जास्त संख्येत सोडून आले होते.

आम्ही येथे ती संख्याही देत आहोत.
1. अपोलो 11 ल्यूनर मॉड्यूल डिसेंट स्टेज (1)
2. अमेरिकन झेंडा 3’बाय 5’(1)
3. लेजर रँगिग रेट्रोरिफ्लेक्टर (1)
4. पॅसिव्ह सिसमिक एक्सप्रीमेंट (1)
5. नील आर्मस्ट्राँगचे लाइफ सपोर्टिव्ह सिस्टम (1)
6. नील आर्मस्ट्राँगचे अपोलो स्पेस बूट (2)
7. एडविन (बज) चे लाइफ सपोर्टिव्ह सिस्टम (1)
8. एडविन (बज) चे अपोलो स्पेस बूट (2)
9. रिकामी फूड बॅग (2+)
10. राष्ट्रपती निक्सन, जॉन्सन, आयजनहावर यांच्यासह 73 नेत्यांचे स्टेटमेंट असणारी सिलिकन वॅली (1)
11. शांतीचे प्रतीक ऑलिव्ह ब्रँचची प्रत (1)
12. अपोलो-1 वर्जिलचा मिशन पॅच (1)
13. मून मॉड्यूल डिसेंटशी संबंधीत स्मारक पट्टीका (1)
14. टीव्ही कॅमेरा (1)
15. स्प्रिंग स्केल (2)
16. टाँग्स (1)
17. छोटे स्कूप (1)
18. मोठे स्कूल सॅम्पल (1)
19. स्काँग्स (1)
20 ट्रँचिंग टूल (1)
21. कॅमेरा (हॅसलब्लेड आयई डेटा) (1)
22. आर्म रेस्ट्स (1)
23. मेसा ब्रॅकेट
24. सोलर विंड कंपोजिशन स्टाफ (1)
25. हँडल ऑफ कॉन्टेनजेन्सी ल्यूनर सॅम्पल रिटर्न कंटेनर (1)
26. दोन मृत अंतराळ प्रवाशांचे स्मरण करणारे पदक (2)
27. डॉक्यूमेंट सम्पल बॉक्स सील (1)
28. स्टोरेज कंटेनर (रिकामा) (1)
29. हॅसलब्लेड पॅक (1)
30. फिल्टर पोलरायजिंग (1)
31. रिमोट कंट्रोल युनिट (पीएलएसएस) (2)
32. डिफेक्शन कलेक्टिव डिव्हाइस (4)
33. फिल्म मॅगझीन (2)
34. ओवर शूज़, ल्यूनर (2)
35. कव्हर, पीजीए गॅस कनेक्टर (2)
36. किट इलेक्ट्रिक वेस्ट, रश्शी (1)
37. बॅग एसी, सामान पोहचवणारी रश्शी (1)
38. सामान पोहचवणारी रश्शी (1)
39. बॅग, डिप्लोयमेंट उपकरण कन्वेयर (1)
40. लाइफ लाइन, एलटी. डब्ल्यूटी (1)
41. ईव्हीए कंबर रश्शी (4)
42. बॅग, डिप्लोयमेंट, लाइफ लाइन
43. फूड असेम्बली, एलएम (4 मॅन डे) (1)
44. टीव्ही सबसिस्टम, ल्यूनर (1)
45. लेन्स टीव्ही वाइड अँगल (1)
46. लेस टीव्ही ल्यूनर डे (1)
47. केबल असेम्बली, टीव्ही (100 फुट) (1)
48. अ‍ॅडप्टर, एसआरसी/ओपीएस (2)
49. कॅनिस्टर, ईसीएच एलआयओएच (2)
50. युरिन कलेक्शन असेम्बली, लहान (2)
51. युरिन कलेक्शन असेम्बली, मोठी (2)
52. बॅग एमेसिस (4)
53. फिल्टर, ऑक्सीजन बॅक्टेरियल (1)
54. कंटेनर असेम्बली, डिस्पोजल (1)
55. कंटेनर, पीएलएसएस कंडेनसेट (1)
56. अँटीना, एस-बँड (1)
57. केबल, एस-बँड अँटीना (1)
58. बॅग, ल्यूनर इक्यूपमेंट ट्रान्सफर (1)
59. पॅलेट असेम्बली ञ्च् 1 (1)
60. सेंट्रल स्टेशन (1)
61. पॅलेट असेम्बली ञ्च् 2 (1)
62. प्रायमरी स्ट्रक्चर असेम्बली (1)
63. हॅमर (1)
64. ग्नोमन (माऊंट सोडून) (1)
65. ट्रायपॉड (1)
66. हँडल/केबल असेम्बली (टीव्ही कॅमेरा कॉर्ड)
67. यॉर्क मेश पॅकिंग मटेरियल (1)
68. एसडब्ल्यूसी बॅग (एक्स्ट्रा) (1)
69. कोर ट्यूब बिट्स (2)
70. एसआरसी सील प्रोटेक्टर्स (2)
71. पर्यावरण सॅम्पल कंटेनर्स ’ज’ रिंग्स (2+)
72. अपोलो ल्यूनर सर्फेस क्लोज-अप कॅमेरा (1)
73. ल्यूनर उपकरण कन्वेयर (1)
74. ईसीएस कॅनिस्टर (1)
75. ईसीएस ब्रॅकेट (1)
76. ओपीएस ब्रॅकेट (2+)
77. लेफ्ट हँड साइड स्टोव्हेज कंपार्टमेंट (1)
78. फुट प्रिंट
79. एक्सटेंशन हैंडल
80. स्टेनलेस स्टील कवर (9बाय7 5/8 इंच बाय1/16 इंच मोठे)
81. झेंडा प्लास्टिक कव्हरिंग
82. 8 फुट अ‍ॅल्युमिनियम ट्यूब
83. झेंड्यासाठी 2+ रिटेनिंग पिन्स
84. इन्सुलेटिंग ब्लँकेट
85. छोटी अ‍ॅल्युमिनियम कॅप्सूल