Coronavirus : इराणमधून आतापर्यंत 389 भारतीयांची घर’वापसी’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या धास्तीने संपुर्ण जगात हाहाकार माजला आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त परदेशात असणार्‍या मूळ निवासी भारतीयांनी देशात धाव घेतली आहे. अनेकांनी केंद्र सरकारकडे सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत सुटकेची मागणी केली आहे. त्यानुसार भाारतीयांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे. नुकतीच इराणमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची चौथ्या बॅचमध्ये 52 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत इराणमधून 389 जणांची सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, यांनी दिली आहे.

करोना विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या इराणमध्ये वास्तव्यास असलेले 52 भारतीय विद्यार्थी स्वगृही परतले आहेत. त्यांच्यासोबत एका शिक्षकाचाही समावेश आहे. त्यामुळे इराणमधून सुटका झालेल्या एकूण भारतीयांची संख्या आता 389 इतकी झाली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती दिली.
इराणमधून 53 भारतीयांची चौथी बॅच भारतात परतली आहे. यामध्ये 52 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.

इराणची राजधानी तेहरान आणि शिराज या शहरांमधून भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे इराणमधून सुटका झालेल्या एकूण भारतीयांची संख्या 389 झाली आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या इराणमधील भारतीय दुतावास आणि इराणच्या उच्चाधिकार्‍यांचे परराष्ट्र मंत्र्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी जयशंकर यांच्यामध्ये जगाला बाधा झालेल्या करोना विषाणूचा प्रसार रोखण्याबाबत आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा झाली. त्यानुसार अमेरिकेत करोना बाधितांची संख्या 3 हजार एवढी आहे. भारतात परदेशी पर्यटकांसह ही संख्या 110 असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली होती.