आश्चर्यकारक ! ७ वर्षाच्या मुलाच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात ; ‘हे’ असू शकते आजाराचे कारण

चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे. येथील एका लहान मुलाच्या तोंडातून तब्बल ५२६ दात काढले आहेत. आश्चर्य म्हणजे हे दात जबड्याच्या हाडांमध्ये अशा प्रकारे उगवले होते की ते बाहेरून दिसूही शकत नव्हते. आता या मुलाच्या तोंडात २१ दात राहिले असून शस्त्रक्रियेनंतर त्याच्या जबड्यात होणारा त्रास आणि दुखणे थांबले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सात वर्षांच्या रवींद्रनाथच्या उजव्या गालाला आलेली सूज पाहून पालकांना वाटले की त्याचा दात किडला आहे. मात्र दवाखान्यात नेल्यानंतर कळाले की त्याच्या जबड्यात ५२६ दात लपले आहेत. त्यानंतर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर आता त्याच्या जबड्याचे दुखणे थांबले असून थोडी सूज आहे, जीदेखील काही काळात कमी होईल.

कित्येक तासांच्या प्रयत्नानंतर शस्त्रक्रिया यशस्वी :

येथील सविता डेंटल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले की असा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून रवींद्र च्या पालकांना शस्त्रक्रियेसाठी सहज तयार केले. मात्र मुलाला मनवायला कित्येक तासांचा अवधी लागला. ही शस्त्रक्रिया ५ तास चालली. रवींद्र जेव्हा ३ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या पालकांना त्याच्या उजव्या गालावर सूज दिसली. त्यावेळी त्यांनी त्याला एका सरकारी दवाखान्यात नेले असता ते रवींद्रला शस्त्रक्रियेसाठी तयार नाही करू शकले. तो खूप लहान असल्याने पालकांनी देखील याकडे जास्त लक्ष दिले नाही.

‘हे’ असू शकते कारण :

डॉक्टर सेंथिलनाथन यांनी सांगितले की यामागील कारण एक आजार असून याचे निश्चित कारण सांगता येणार नाही. मात्र मोबाईल टॉवरचे रेडिएशन आणि अनुवांशिक कारणामुळे असे होऊ शकते. या महाविद्यालयाने केलेल्या एका संशोधनामध्ये त्यांनी मोबाईल टॉवर जवळ राहणाऱ्या २५० लोकांचा सर्व्हे केला होता. ज्यातील १० टक्के लोकांमध्ये विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. जे बदल अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतात.

मुंबई च्या एका मुलीच्या जबड्यातून देखिल काढले होते २३२ दात :

२०१४ मध्ये मुंबईच्या एका मुलाच्या तोंडातून देखील २३२ दात काढले गेले होते. मात्र अशा प्रकारे दात काढून टाकल्यानांतर परत त्याजागी दात येण्याची शक्यता कमी असून तो १६-१७ वर्षांचा झाल्यानंतर दंतरोपण पद्धतीचा वापर करून त्याला दात बसवता येतील.

आरोग्यविषयक वृत्त