अबब ! ‘या’ आमदाराच्या फ्लॅटमध्ये सापडलं 53 लाखाचं ‘घबाड’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार आणि आमदार रमेश कदम याला कारागृहात नेण्याऐवजी पोलिसांनी चक्क एका फ्लॅटवर नेले. ही बातमी समजताच ठाणे पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेव्हा त्या फ्लॅटमध्ये रमेश कदम, एक व्यक्ती हे दोघे 53 लाख 46 हजार रुपयांच्या रोकडसह मिळाले.

53 lakhs seized from Prison MLA Ramesh Kadam | तुरुंगातील आमदार रमेश कदम यांच्याकडून ५३ लाखांची रोकड हस्तगत

अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आणि आमदार रमेश कदम हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करुन वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात तपासणी करावी, असा सल्ला दिला. त्यानुसार शुक्रवारी त्याला पोलीस बंदोबस्तात ठाणे कारागृहातून काढून जे जे रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून पुन्हा सोमवारी घेऊन येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पोलीस एस्कॉर्ट पार्टी त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यासाठी घेऊन निघाली.

दरम्यान, एस्कॉर्ट पथकाचे पोलीस उपनिरीक्षक यांनी वैद्यकीय तपासणणीनंतर रमेश कदम याला पोलीस व्हॅनमधून न आणता मुंबई येथून एका खासगी गाडीतून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली.

या बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलीस अधिकारी, निवडणुक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी यांनी घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसिडेन्सी येथील फ्लॅटवर छापा घातला. त्या ठिकाणी आमदार रमेश कदम व एक व्यक्ती असे दोघे जण होते. फ्लॅटची तपासणी केली असता तेथे 53 लाख 46 हजार रुपये आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहे.

पोलीस एस्कॉर्ट पार्टीतील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी