PoK मधील 5300 विस्थापित कुटुंबियांना मोदी सरकारचं ‘गिफ्ट’, 5 लाख 50 हजाराच्या मदतीची घोषणा

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – केंद्र सरकारने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मिरमधून विस्थापित झालेल्या कुटुंबीयांविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. या कुटुंबियांना केंद्र सरकार मदत करणार असून 5300 कुटुंबाना साडेपाच लाख रुपये मदत देण्याची मोदी सरकारने घोषणा केली आहे. या निर्णयाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वागत केले असून या कुटुंबाना न्याय मिळणार असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, पाकच्या ताब्यातील असलेल्या काश्मीरमधील या सुमारे 5300 कुटुंब जम्मू आणि काश्मीरमध्ये वसलेली आहेत. त्यांना केंद्राच्या मदतीने प्रत्येकी साडेपाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com