सराफाचे दुकान फोडले

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

निगडी येथील वर्दळीच्या टिळक चौकातील चंदन ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानातील दोन लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यामध्ये ५४ ग्रॅम सोने आणि पावणेचार किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरीला गेली आहे. हा प्रकार शनिवारी पहाटेच्या सुमारास घडला.

या प्रकरणी आशिष अशोक सिरोया (रा. लक्ष्मीविलास सोसायटी, मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निगडी येथे सिरोया यांचे चंदन ज्वेलर्स आहे. नेहमी प्रमाणे ते दुकान बंद करून गेले होते. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले. दुकानातील तीन किलो ८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच ड्रॉव्हरमधील रोख रक्कम चोरून नेली.
[amazon_link asins=’B07DB4GKJB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dc23efed-92f7-11e8-a9bf-b57411783db6′]
घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सराफाने चार दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत आहेत. परिसरातील रेकॉर्डवरील चोरट्यांची तपासणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आहे. सराफाचे दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडी येथील वर्दळीच्या आणि २४ तास वाहतूक सुरू असणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील टिळक चौकातील दुकान फोडले. विशेष म्हणजे अवघ्या १०० मीटरवर प्राधिकरण पोलीस चौकी आणि २०० मीटरच्या अंतरावर निगडी पोलीस ठाणे असतानाही चोरट्यांनी दुकान फोडण्याचे ‘डेरिंग’ केले आहे.पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.