निगडीतील तरुणाची ५४ लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन 

फोन वरुन ओळख झालेल्या महिलेने शरीरसंबंधाचे आमिष दाखवून, वडिलांच्या उपचारासाठी पैसे पाहिजे असल्याचे खोटे सांगून तरुणाकडून तब्बल ५४ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

जाहीरात 

या प्रकरणी जहीर युसूफ शिकलगार याने फिर्याद दिली आहे. तर एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने जहीर याच्या मोबाईलवर फोन करून ओळख वाढवली. वारंवार फोन करुन चांगला विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने त्याच्या सोबत शरीरसंबंध ठेवायला तयारी दर्शवली. दरम्यान वडिलांच्या कॅन्सरचा बहाणा करून जहीरकडून वेळोवेळी पैसे काढून घेतले. जहीरने महिलेला वेळोवेळी पेटीएम, फोन-पे, मोबी क्विक, एसबीआय व्हॅलेट आणि बँकेच्या खात्यातून आयएमपीएस करून एकूण ५३ लाख ६५ हजार रुपये तिला पाठवले. पैसे मिळाल्यानंतर महिलेने फोनवर बोलणे कमी केले. जहीरने पैशाची मागणी केल्यानंतर महिलेने पैसे परत न देता त्याची फसवणूक केली. तपास निगडी पोलिस करत आहेत.

[amazon_link asins=’B06Y5KT643,B06Y4PHKRC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b4b8531-b1a9-11e8-8679-6503cfd86335′]

अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचा पुतळा जाळून निषेध