पुण्यात विदेशी सिगारेटचा 54 लाखांचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोंढवा भागात लॉकडाऊन काळात राहत्या घरात विदेशी सिगारेटचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यास गुन्हे शााखेने अटक केली. त्याच्याकडून ५३ लाख ५९ हजारांचा सिगारेट साठा जप्त करण्यात आला. हरीश पोकाराम चौधरी (वय २६, रा. महावीर रेसीडन्सी, कोंढवा ) असे पकडण्यात केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश होलसेल किराणा दुकानदार आहे. कोंढवा बुद्रूक परिसरातील महावीर रेसीडन्सी इमारतीत राहायला आहे. लॉकडाउन सुरु असताना जादा पैसे कमविण्याच्या हेतूने राहत्या घरी त्याने विदेशी सिगारेटचा साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याची खातरजमा केली. त्यावेळी त्याने त्याच्या कोंढव्यातील महावीर रेसीडन्सी येथे राहत्या घरी साठा केला असल्याचे समोर आले.

यानुसार याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. घराची झडती घेतली असता त्यात ५३ लाख ५९ हजारांचा विदेशी सिगारेटचा साठा मिळून आला. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, प्रवीण शिर्के, अर्जुन दिवेकर, सुशील काकडे, शिवाजी राहिगुडे, हेमा ढेबे, अमित छडीदार, योगेश मोहिते, यशवंत खंदारे, गोपाल मदने, विवेक जाधव यांच्या पथकाने केली.