राज्यातील ५४ नवीन हॉस्पिटलमध्ये मिळणार पोलिसांना उपचार

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कुटुंबीयांच्या आजारपणात उपचार घेण्यासाठी पोलीस विभागांतर्गत नवीन ५४ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे या नव्या हॉस्पिटलमध्ये पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार घेता येणार आहेत. मात्र, उपचार घेण्याचा कालावधी एक वर्षापर्यंतच राहणार आहे.
[amazon_link asins=’B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d2aa83b-a3af-11e8-9f86-cfcaf0211e30′]

राज्य सरकारने सन २००५ यावर्षी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी कुटुंब आरोग्य योजना सुरू केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांतील महत्त्वाच्या हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला होता. याचा फायदासुद्धा पोलीस विभागातील कुटुंबीयांनी घेतला. याच आधारे यावर्षीसुद्धा पोलीस विभागांतर्गत ५४ नवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42757bc8-a3af-11e8-97fc-119f82acbd8d’]

नवीन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासन निविदेत २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती, नांदेड, सोलापूर, नागपूर, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, लातूर, सातारा यासारख्या मोठ्या जिल्ह्यांतील हॉस्पिटलचा समावेश आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना व कुटुंबीयांना या ५४ हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा कालावधी हा ६ ऑगस्ट ते ३० जून २०१९ पर्यंत ठरविण्यात आला आहे.