Coronavirus : दिलासादायक ! ठाण्यातील मीरा-भाईंदरमध्ये 56 रूग्णांनी केली COVID-19 वर मात, झाले ‘कोरोना’मुक्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. ठाण्यातील मीरा भाईंदरमध्ये आज (शनिवार) एकाच दिवशी 56 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले. मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी 45 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते घरी परतले होते. आज यामध्ये आणखी 56 जणांची भर पडल्याने आता मीरा भाईंदरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या 101 झाली आहे.

मीरा भाईंदरमध्ये शहरात आजच्या घडीला 161 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असे असताना आज पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन, आपल्या घरी गेले आहेत. आज या सर्वांना रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला. यामध्ये 2 वर्षाच्या लहान मुलीपासून 60 वर्षाच्या वयोवृद्धांपर्यंतची लोकं होती. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातून 56 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी जात होते त्यावेळी पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे हे स्वत: उपस्थित होते. सध्या मीरा भाईंदर शहरात कोरोना पॉझिटिव्ह बरे झालेल्यांची संख्या 101 एवढी झाली आहे. तर आता 57 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत