चार वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ५५ जवान शहीद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शत्रूच्या घरात घुसून मारू अशी वल्गना करणाऱ्या भाजप सरकारच्याच कार्यकाळात २०१४ पासून ते २०१८ पर्यंत ५५ जवानांना देशसेवा करताना वीरगती प्राप्त झाली आहे. २०१७ मध्ये २० जवान शत्रुंसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. तर २००९ मध्ये १० जवान शहीद झाले. २०१० मध्ये १४ जवान शहीद झाले होते. या पुढील वर्षात प्रतिवर्षी ८, ६, ८, १०, ८, १३ तर २०१७ मध्ये २० आणि चालू वर्षात ४ जवान शहीद झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल चनशेट्टी यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’304d7b55-d02d-11e8-943a-711027e1f73c’]

राज्याच्या सैनिकी कल्याण कार्यालयाकडे मागील १० वर्षात राज्यातील किती जवान शहीद झाले व अपंग किती झाले याची सविस्तर माहिती चनशेट्टी यांनी मागवली होती. त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने पुरवलेल्या माहितीमध्ये २००९ पासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील १०१ जवानांना विविध ऑपरेशनमध्ये वीरमरण पत्करावे लागले आहे. १० वर्षात एकही मोठे युद्ध झाले नाही तरीदेखील देशाच्या विविध भागात देशसेवा करताना भारतीय जवान शहीद झाले आहेत. देश सेवा करताना राज्यातील सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक १६ जवान शहीद झाले आहेत. त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जवानांचा समावेश आहे.

[amazon_link asins=’B0773LN76P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37fb1e9a-d02d-11e8-a59f-05931e5083f3′]

माहिती अधिकारात प्राप्त झालेली शहिदांची ही आकडेवारी एकट्या महाराष्ट्राची आहे. यावरुन देशातील शहीद जवानांचा आकडा याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असणार आहे. शत्रूच्या घरात घुसून मारू अशी वल्गना करणाऱ्या भाजप सरकारच्याच कार्यकाळात २०१४ पासून ते २०१८ पर्यंत ५५ जवानांना वीरगती प्राप्त झाली. २०१७ मध्ये २० जवान शत्रुंसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. तर २००९ मध्ये १० जवान शहीद झाले. २०१० मध्ये १४ जवान शहीद झाले होते. या पुढील वर्षात प्रतिवर्षी ८, ६, ८, १०, ८, १३ तर २०१७ मध्ये २० आणि चालू वर्षात ४ जवान शहीद झालेत. देशसेवा करताना कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या राज्यातील जवानांची संख्याही काही कमी नाही. तब्बल ५१ जवानांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.