पुणे जिल्हा परिषदेकडून मुस्लिम धर्मिंयासाठी 56 लाख निधी : प्रविण माने

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील मुस्लिम धर्मियांच्या विविध विकास कामांसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून विकास योजनेअंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी ५६ लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी दिली. ते इंदापूर येथे बोलत होते.

प्रविण माने हे पुणे जिल्हा परिषद बाधकाम व आरोग्य सभापती या पदावर रूजू झाल्यापासुन त्यांचे माध्यमातून इंदापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असुन अनेक कामे मार्गी लागल्याने प्रविण माने हे त्यांच्या कार्यशैलीमुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरा घरामध्ये पोहचले आहेत. जि. प. बांधकाम (दक्षिण) विभागामार्फत अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. या योजनांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या विविध विकास कामांसाठी ५६ लाख रूपये निधी मंजूर करण्यात आलेला असुन त्या नीधीतून मुस्लिम समाजातील पुढील कामे मार्गी लावण्यात येणार असल्याची माहीती प्रविण माने यांनी दीली.

रूई ता.इंदापूर येथिल मुस्लिम धर्मिय मस्जिदसाठी वाॅल कंपाउंड व पेव्हिंग ब्लाॅक बसविणे १० लाख रूपये, बोरी येथे समाज बांधवांसाठी सभाग्रह बाधणे ४ लाख, सराटी येथे मुस्लिम दफन भुमी संरक्षक भिंत बांधकाम ५ लाख, भिगवण स्टेशन जामा मस्जिद सभाग्रह बांधकाम ५ लाख, भिगवन स्टेशन जामा मस्जिद संरक्षक भिंत बांधकाम ५ लाख, सणसर येथे सार्वजनिक सभाग्रह शादीखाना बांधकाम ४ लाख, शिरसवडी येथिल दफनभुमी मुरमीकरण ३ लाख, शिरसवडी दफनभुमी वाॅल कंपाऊड ५ लाख, लोणी देवकर मुस्लिम दफनभुमी वाॅल कंपाऊड ३ लाख, शेटफळ हवेली शादीखाना ७ लाख, बेलवडी शादीखाना बांधकाम ५ लाख रूपये असा एकूण ५६ लाख रूपये निधी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याची माहीती पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी इंदापूर येथे दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like