अतिवृष्टीग्रस्त शाळांसाठी ५७ काेटींचा निधी देणार ; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची घाेषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील अनेक शाळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा घेण्यात यर्त होता. त्यानंतर यासंदर्भात आज महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज (रविवारी) केली. अतिवृष्टीचा फटका बसल्याने राज्यातील १५५ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २ हजार १७७ शाळांना शाळांच्या वर्ग खोल्यांची नव्याने बांधणी व दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असून येथील पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी ५७ कोटींचा निधी देण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – शिक्षणमंत्री

शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पुर बाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुण्यात घेतली. या बैठकीस शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण विभागाचे संचालक व शिक्षण अधिकारी हेदेखील उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे १ लाख ६३ हजार २७५ विद्यार्थ्यांना बसेल असा अंदाज असून ५३ पुर्ण वर्ग खोल्याचे तातडीने बांधकाम करावे लागणार आहे. तसेच २ हजाराहून अधिक शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. ३६ शाळांचे किचनशेड बाधित झाले असून ४७७ शाळांमधील शालेय पोषण आहाराचे नुकसान झाले आहे. अशी माहिती शेलार यांनी दिली. वर्ग खोल्या बांधणीसाठी आवश्यक असलेला निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिक्षण विभागांतर्गत २८५ अभियंते यासाठी काम करतील. याबरोबरच प्रशासन जोमाने काम करत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद होणार नाहीत :

कमी पटसंख्या असणा-या शाळा बंद करण्याबाबत परिपत्रक काही काळापूर्वी प्रसिध्द करण्यात आले होते. परंतु कोणतीही शाळा बंद करण्याची भुमिका शासनाची नसून त्या पत्राची अंमलबजावणी केली जाऊ नये, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

काही शाळांमध्ये पुरग्रस्तांसाठी तात्पुरती निवा-याची व्यवस्था करण्यात आली आहे, आशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जवळच्या खाजगी शाळांमध्ये करता येईल का ? किंवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का ? याबबात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षणाधिका-यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

 

 

You might also like