वाघोलीत तब्बल ५७ लाखांचा गुटखा जप्‍त, पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली येथे ‘अन्न व औषध प्रशासन विभाग’ आणि लोणीकंद पोलिस यांनी केली मोठी कारवाई करत सुमारे ५७ लाख रुपयांचा गुटखा केला जप्त केला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

लोणिकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅपल हॉटेलच्या पाठीमागे, उबाळेनगर येथे विश्वनाथ विठ्ठल उबाळे यांच्या गोडाऊन क्र. १ येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गोवा-गुटखा साठा साठवून ठेवलेला आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यासह संयुक्त कारवाई करून छापा घालण्यात आला. या ठिकाणाहून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखू असा सुमारे ५७,६१,६००/- रुपये किंमतीचा अवैध गोवा गुटखा मिळून आला आहे.
यामध्ये महक सिल्व्हर पान मसालाचे २८२८८ पाकिटे तर एम १ जर्दा ची २८०८० पाकिटे सापडली. त्यानुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात गोडाऊन मालक नरेंद्र विश्वनाथ उबाळे व गुटखा विक्री व साठा करणारा विरमाराम बिजलाजी तराडिया यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे संतोष सांवत , ए. एस. गवते, आर. आर. काकडे हे उपस्थित होते. ही कारवाई संदीप पाटील (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), विवेक पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग), डॉ. सई भोरे-पाटील मॅडम (उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग) या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत (पोलीस निरीक्षक- गुन्हे), सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उप निरीक्षक संतोष लांडे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त