लस घेतल्यानंतर कोरोना होण्याचा धोका किती? लसीकरणानंतर देशातील इतक्या लोकांना झाला Covid-19 चा संसर्ग, जाणून घ्या

नवी दिल्ली: कोरोना विषाणूविरुद्ध लस घेणाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. वास्तविक असे म्हंटले आहे की लस लागू झाल्यानंतरही अनेक लोकांना covid-19 संसर्ग होऊ शकतो. आतापर्यंत सरकारने असे सांगितले आहे की देशात कोवॅक्सीनचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे ०.०४% लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आणि कोविशील्डच्या दुसऱ्या डोसानंतर ०.०३% लोकांना संसर्ग झाला आहे. कोविशील्ड किंवा कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर २१००० हुन अधिक लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले, तर दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी ५५०० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले.

vaccine-report
vaccine-report

सरकारने २० एप्रिलपर्यंतची ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, कोविशिल्डचे ११.६ दशलक्षांपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. १०,०३,०२,७४५ लोकांनी पहिला डोस घेतला, ज्यामधून १७,१४५ कोविड पॉजिटीव्ह झाले आहेत. १,५७,३२,७५४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे, ज्यामधून ५०१४ लोकांना संसर्ग झाला आहे. तर कोवॅक्सीनचे १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त लोकांना डोस देण्यात आला आहे. ९३,५६,४३६ लोकांना पहिला डोस मिळाला आहे, ज्यामध्ये ४२०८ कोरोना पॉजिटीव्ह आले आहे आणि १७,३७,१७८ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे, ज्यामध्ये ६९५ लोकांना कोरोना झाला आहे.

१३ कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहेत
भारताने covid-19 महामारीच्या विरुद्ध असलेल्या या लढाईत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानादरम्यान एकूण १३ कोटी लसीकरणाचा डोस देऊन महत्वपूर्ण विजय मिळवला आहे. काल सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १९,०१,४१३ सत्रांमध्ये लसीकरणाचे एकूण १३,०१,१९,३१० डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ९२,०१,७२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि ५८,१७,२६२ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. याशिवाय १,१५,६२,५३५ फ्रंट लाईन कामगारांना पहिला डोस देण्यात आला आणि ५८,५५,८२१ फ्रंट लाईन कामगारांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ४,७३,५५,९४२ लाभार्थ्यांना पहिला आणि ५३,०४,६७९ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यासोबतच ४५ ते ६० वर्ष वय असणाऱ्या ४,३५,२५,६८७ लोकांना पहिला आणि १४,९५,६५६ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.