डायबिटीज रूग्णांना हृदयरोगाचा धोका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डायबिटीजमुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात. टाइप २ डायबिटीजच्या रूग्णांमध्ये ५८ टक्के मृत्यू हे हृदयासंबंधी रोगांमुळे होतात. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यू आणि हृदयासंबंधातील आजारांचा धोका असतो.

जेव्हा आपल्या शरीरातील पॅनक्रियामध्ये इन्सुलिन पोहचणं कमी होतं, त्यावेळी ग्लूकोजचा स्तर वाढतो. या स्थितीला डायबिटीज किंवा मधुमेह असं म्हणतात. इन्सुलिन एक हार्मोन आहे, जे पचन ग्रंथींपासून तयार होतात. याचं काम शरीरातील अन्न एनर्जीमध्ये परावर्तित करण्याचं असतं. याशिवाय हे हार्मोन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात. डायबिटीज असलेल्या व्यक्तींना शरीरातील अन्न एनर्जीमध्ये बदलणं कठिण होतं. या परिस्थितीमध्ये ग्लूकोजचा वाढलेला स्तर शरीराच्या विविध अवयवांना नुकसान पोहोचवतो.

मधुमेहामुळे वाढणारं शरीरातील साखरेचं प्रमाण रक्त वाहिन्यांना नुकसान पोहोचवतं. यामुळे ब्लड प्रेशर, डोळ्यांचं आरोग्य आणि सांधेदुखीसारख्या इतर समस्याही उद्भवतात. टाइप २ डायबिटीजने ४४.२ कोटी लोक त्रस्त आहेत. मेक्सिकोतील आरोग्य सचिवालयाच्या माहितीनुसार त्यांच्या देशातील १.३ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यातील फक्त अध्र्या लोकांनाच माहीत आहे की, त्यांना मधुमेह झाला आहे. २०१५मध्ये फक्त मेक्सिकोमध्ये ९८ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू डायबिटीजने झाला होता आणि मृत्यू होणाऱ्या लोकांचं सरासरी वय ६६.७ वर्ष एवढचं होतं. कॅनाग्फ्लिोजिन या औषधासोबत एक व्यक्ती १०० मिलीग्रॅम साखर प्रतिदिन कमी करू शकतो. ज्यामुळे दररोज ४००० कॅलरी कमी होतात. ज्या वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

डायबिटीजची लक्षणं महिलांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त आढळून येतात. मधुमेह जास्तीत जास्त आनुवांशिक आणि अनियमित जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. यामध्ये आनुवांशिकतेमुळे टाइप-१ आणि अनियमित जीवनशैलीमुळे टाइप-२ डायबिटीज असं डायबिटीजचं दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येतं. कमी शरीरिक श्रम, अपूर्ण झोप, अनियमित खाणं, गोड पदार्थ आणि फास्टफूडचा आहारामध्ये जास्त समावेश, यामुळे डायबिटीजचा धोका आणखी वाढतो.