5G Internet | Airtel घेऊन आली पुणेकरांसाठी 5G सेवा; सध्या ‘इथे’ मिळणार 5G नेटवर्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- भारती एअरटेलने (Airtel) पुण्यातील लोहगाव (Lohgaon) येथील विमानतळावर (Pune International Airport) 5 जी (5G Internet) सेवा सुरु केली आहे. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) महिन्याभरापूर्वी मोबाईल काँग्रेसमध्ये (Mobile Congress) भारतात 5 जी (5G Internet) सेवेचा आरंभ केला होता. त्यानंतर जिओ (Jio) आणि एअरटेलने (Aitel) लवकरच भारतात 5 जी सेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार भारतातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5 जी सेवा सुरु करण्यात येणार होती. त्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश होता. त्या अनुषंगाने एयरटेलने आज लोहगाव विमानतळावर त्यांची सेवा सुरु केली. राज्यात 5 जी सेवा देणारे लोहगाव हे पहिले विमानतळ आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 5 जी (5G Internet) मोबाईल लागेल. पण तुम्हाला तुमचे सिम कार्ड (sim card) बदलण्याची गरज पडणार नाही.

दरम्यान, एअरटेलची ५ जी सेवा दिल्ली, बंगळुरू, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानीपत,
आणि गुरुग्राम या विमानतळांवर सुरू करण्यात येणार आहे. मोबाइल इंटरनेटच्या वेगाबाबतीत, 5G नेटवर्क
तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड होतील. 4G मध्ये जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.

Web Title :-  5G Internet | good news for pune residents 5g plus service started at lohgaon airport by airtel bharati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Inflation | सोने-चांदी आणि पामतेल पुन्हा एकदा महागले

Rohit Pawar | ‘खरा इतिहास एकदा सर्वांच्या समोर येऊ द्या’ – आ. रोहित पवार

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू