यंदा Oppo, Vivo, Xiaomi, OnePlus सह अनेक कंपन्यांकडून होणार 5G फोन ‘लाँच’, किंमतीचा झाला ‘खुलासा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात लवकरच 5G टेक्नॉलॉजिला सुरुवात होणार आहे. टेलिकॉम कंपन्या आणि दूरसंचार विभागामध्ये याबाबतच्या ट्रायल संधर्भात सहमती झाली आहे. ओप्पो, वीवो, शियोमी, वनप्लस समवेत स्मार्टफोन बनवणाऱ्या अनेक कंपन्या भारतात 5G चे लॉंचिंग करणार आहे. ग्लोबल रिसर्च फर्म TechArc च्या रिसर्चचे म्हणणे आहे की, पंधरा ते अठरा मॉडेल्स 5G नेटवर्क फिचर लॉंच करू शकतात. या स्मार्टफोनच्या किमती भारतात 30 हजारांच्या आसपास असणार आहेत.

इंटरनेशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या अहवालानुसार, अफोर्टिबिलिटी फैक्टरला लक्षात घेऊन कंपन्या या वर्षी 4G आणि 5G दोनीही मॉडेल्स भारतात लॉंच करू शकतात.

2020 मध्ये 10 5G फोन आणणार Xiaomi
शाओमी 2020 च्या उत्तरार्धात कमीत कमी 10 5G स्वस्त फोन जाहीर करण्याची योजना आखत आहे. तसेच, काही काळापूर्वी, शाओमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेई जून (Lie Jun) यांनी 2019 च्या चायना मोबाइल ग्लोबल पार्टनर कॉन्फरन्समध्ये निश्चित केले होते की 285 डॉलर (2000 युआन/20 हजार रुपये) पेक्षा जास्त किंमतीचे सर्व शियोमीचे सर्व स्मार्टफोन 5 जी फोन होतील.

एवढेच नाही शाओमीने Redmi K30 बाबत देखील निश्चित केले होते की,हा फोन 5G असणार आहे. यानुसार अंदाज लावला जात आहे की, Redmi K30 ची किंमत देखील फार काही जास्त नसेल केवळ पंचवीस – तीस हजारांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/