मुकेश अंबानींची मोठी घोषणा ! देशात लवकरच 5G ची ‘क्रांती’

पोलीसनामा ऑनलाइन –  देशात 5G नेटवर्क कधी सुरु होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावर रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेत 5G च्या स्मार्टफोननी रुंजी घालायला सुरुवात केली आहे. २० ते ३० हजारांत वनप्लस, मोटरोला, व्हिवोचे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. कोणाचा स्मार्टफोन किती स्वस्त, त्यामध्ये प्रोसेसर कोणता आदी चर्चा होत आहे.

दुसऱ्या सहामाहीत भारतात रिलायन्स जिओ (Reliance Jio) 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही आहे. जेव्हापर्यंत सोपे धोरणात्मक बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग व स्वस्त बनविले जाणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. 2021 मध्ये जिओ भारतात ‘5G’ ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क स्वदेशी असेल. याशिवाय हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीदेखील स्वदेशीच असणार आहे. जिओच्या माध्यमातून आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहोत. भारताला ‘5G’ स्पेक्ट्रमवर लवकरात लवकर निर्णय़ घ्यावा लागणार आहे. सोबतच जिओ ही ‘5G’ क्रांतीची लीडर ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल यावेळी काँग्रेसमध्ये बोलताना म्हणाले.

यावेळी मुकेश अंबानी पुठे म्हणाले, की देशात सध्या ३० कोटी 2G फोन वापरणारे आहेत. त्यांच्यापर्यंत स्मार्टफोन पोहोचण्याची गरज आहे. यासाठी नीतिगत हस्तक्षेपाची गरज आहे. आम्ही डिजिटली खूप चांगल्याप्रकारे जोडले गेलो आहोत. तरीही ३० कोटी लोक अद्याप टूजी वापरत आहेत. येत्या काही दिवसांत भारतात सेमी कंक्टरचा उत्पादन हब होण्याची शक्यता आहे. आम्ही सेमी कंडक्टरच्या आयातीच्या भरवश्यावर राहू शकत नाही.

‘फाइव्ह जी’मुळे होणारे बदल

३१ जुलै १९९५ रोजी मोबाइलचे तंत्रज्ञान भारतात दाखल झाले. तेव्हा एका मिनिटाच्या कॉलसाठी १६.८० रुपये मोजावे लागत होते. आता व्हॉइस कॉल जवळपास विनामूल्य झाले आहेत. चीनपाठोपाठ सर्वाधिक मोबाइल ग्राहक भारतात आहेत. या लक्षणीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण होत असून यापुढील दूरसंचार क्षेत्रातील वाटचाल अधिक आश्चर्यकारक असेल, फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट आॅफटेक्नॉलॉजीचे संचालक अभय करंदीकर यांनी दिली.

दरम्यान, दैनंदिन जीवनातले अनेक घटक या यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणे शक्य होईल. त्यानंतर येणाऱ्या ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीमुळे आपण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करू, असे करंदीकर यांनी सांगितले. इंटरनेट दाखल झाल्यानंतर कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी (इनोव्हेशन) येतील याची कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे फाइव्ह आणि सिक्स जी तंत्रज्ञान कोणकोणत्या नव्या संकल्पना आणि बदलांना जन्म देते हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.
‘फाइव्ह जी’मध्ये इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड १० पटीने वाढणार असून मशिन टू मशिन संपर्क यंत्रणा स्थापन करणे शक्य होणार आहे. त्या परिस्थितीत असंख्य कामांसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरजच शिल्लक राहणार नाही. ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’चे हे युग असेल. टू जी’मध्ये फक्त संभाषण शक्य होते. ‘थ्री जी’मध्ये डेटा दाखल झाला, मात्र त्याचा वेग अत्यंत कमी होता. ‘फोर जी’ दाखल झाल्यानंतर केवळ वेगच वाढला नाही तर आपले संभाषणही डेटाच्या माध्यमातून सुरू झाले. परंतु, हे तंत्रज्ञान फोन, टॅब आदींपर्यंतच मर्यादित होते.

‘फाइव्ह जी’ च्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील ही भीती होती. तो धोका टाळायचा असेल असेल तर बदलत्या परिस्थितीनुसार नवनवी कौशल्य आत्मसात करावी लागतील. १९८९ साली संगणक दाखल झाल्यानंतर लाखो नोकºया जातील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ती निष्फळ ठरली.

– अभय करंदीकर, संचालक , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी

सुरक्षेचा धोका अपरिहार्य
नवे तंत्रज्ञान विकसित करताना रिस्क मॅनेजमेंटवर निश्चितच भर दिला जाईल. तसेच, वैयक्तिक पातळीवरही सुरक्षेबाबत प्रत्येकालाच अधिक सजग व्हावे लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या या अनिर्बंध शिरकावामुळे वैयक्तिक पातळीवर सायबर सुरक्षेचे अनेक मुद्दे उपस्थित होतील. ते अपरिहार्य आहेत.

पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यान

मोदी टेल्स्ट्रा नामक कंपनीच्या मोबाइल नेट सेवेद्वारे पहिला कॉल करण्यात आला होता. कोलकाता येथील रॉयटर्स इमारतीमधून ज्योती बसू यांनी नवी दिल्लीतील संचार भवनात असलेल्या सुखराम यांना पहिला कॉल केला होता. देशात मोबाइलद्वारे पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यान करण्यात आला