×
Homeताज्या बातम्या5G Services | 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार का? 'ते' ट्वीट डिलीट...

5G Services | 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार का? ‘ते’ ट्वीट डिलीट केल्याने संभ्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 5G Services | भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते भारतात 5जी सेवेचा शुभारंभ होईल. ’इंडिया मोबाइल काँग्रेस’ या आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान प्रदर्शनात या योजनेचा शुभारंभ होईल, असे ट्विट केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने केले होते. मात्र, राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने काही काळानंतर हे ट्विट डिलिट केले. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून 5जी सेवा सुरु होणार का? या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (5G Services)

 

भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5ॠ इंटरनेट सेवा सुरु होणार असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल. 5 जी मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे. (5G Services)

 

ऑगस्ट महिन्यात 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता.
त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5जी सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती.
त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये 5जी इंटरनेट सेवा उपलब्ध असेल.

 

भारत सरकारने अल्पावधीत देशात 5जी इंटरनेट सेवेसाठी 80 टक्के भाग कव्हर करण्याचे लक्ष्य ठरवले आहे.
अशी  माहिती केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, 5जी तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल.

 

Web Title :- 5G Services | 5g services to be launched in india by pm modi on october 1 5g services in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News