5G Services In India | सन 2022 मध्ये सर्वप्रथम मुंबई-पुण्यासह ‘या’ 13 शहरांतील ग्राहकांना मिळणार 5G सेवा, जाणून घ्या यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 5G Services In India | भारतात मागील अनेक महिन्यापांसून 5G सेवांची (5G Services In India) ट्रायल सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक ग्राहक 5G सेवांच्या प्रतिक्षेत आहेत. आगामी काही महिन्यात भारतामध्ये 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ही सेवा सगळ्याच शहरामध्ये उपलब्ध नाही. 5G सेवा प्रथम भारतातील काही ठराविक शहरांत सुरू केली जाणार असल्याची माहिती भारतीय दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) दिली आहे.

 

मागील काही महिन्यांपासून दूरंसचार कंपन्या 5G सेवांच्या चाचण्या करत आहे. 5G तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जास्त इंटरनेट स्पीड (Internet Speed) शिवाय स्मार्टफोनच्या तुलनेमध्ये आणखी काही उपकरणे जोडण्यास देखील मदत मिळू शकणार आहे. दरम्या, रिलायन्स-जिओ (Reliance-Jio), एअरटेल (Airtel), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) यासारख्या कंपन्यांनी भारतातील काही शहरांत 5G चाचणीसाठी साईट्स उभारल्या आहेत. ही मेट्रो आणि मोठ्या शहरात 5G सेवा सुरू करणारी पहिली ठिकाणं असतील, असं देखील दूरसंचार विभागाने सांगितलं आहे. (5G Services In India)

 

2022 मध्ये ‘या’ शहरात 5G सेवा –

पुणे

मुंबई

कोलकाता

गुरुग्राम

बंगळुरू

चंडीगढ

दिल्ली

जामनगर

अहमदाबाद

चेन्नई

हैदराबाद

लखनौ

गांधीनगर

 

Web Title :- 5G Services In India | 5g network set start along with mumbai pune and other 11 cities in india first know more details and list

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा