12GB ‘रॅम’, 4 कॅमेर्‍यांसह ‘लॉन्च’ झाला भारताचा दुसरा 5G ‘स्मार्टफोन’, किंमत अजिबात ‘जास्त’ नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – QOO इंडियाने आपला नवा 5 जी स्मार्टफोन IQOO 3 लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लॉन्च केले आहेत. यात 8GB+128GB वेरिएंटची कीमत 36,990 रुपये आहे. तर 8GB+256GB च्या वेरिएंटची कीमत 39,990 रुपये आहे. 12GB+256GB (5G) च्या वेरिएंटची कीमत 44,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

या फोनचा पहिला सेल 4 मार्चला 12 वाजेपासून सुरु होईल. काल लॉन्च झालेल्या या फोनची स्पर्धा realme X50 pro शी असणार आहे. रियलमी X50 प्रो ची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये असणार आहे.

फोनचे खास फिचर्स –
वीवो iQOO 3 5G मध्ये 6.44 इंचाचा फुल HD+ रिजोल्युशन असलेला Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या डिस्पेला खाली फिंगरप्रिंट देण्यात आला आहे, ज्यावरुन दावा केला जाता आहे की यूजर्स 0.31 सेकंदात फोन अनलॉक करु शकतील. कंपनीने डिस्प्लेला Polar View Display असे नाव दिले आहे.

फोनमध्ये क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगा पिक्सलचा असेल तर 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड स्नॅपर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 20X डिजिटल जूम सपोर्ट देण्यात आला आहे आणि यासह सुपर नाइटमोड देखील देण्यात आला आहे.

गेमिंगसाठी खास फीचर –
IQOO UI 1.0 बेस्ड अ‍ॅण्ड्राइड 10 वर काम करतो. यात अल्ट्रा गेम मोड देण्यात आला आहे, ज्यात गेमिंग दरम्यान नोटिफिकेशन आणि कॉल ब्लॉक करता येतात. याशिवाय 4 डी गेमिंग वायब्रेशन आणि मल्टी टर्बो फीचर देण्यात आले आहे. फोनची बॅटरी 4,400mAh ची आहे. जी 55W सुपर फ्लॅश चार्जरने चार्ज होते. कंपनीचा दावा आहे की यामुळे फोन 15 मिनिटात 50 टक्के चार्ज होईल.