5G Spectrum Auction India | 9 महिन्यानंतर 10 पट वाढणार इंटरनेट स्पीड ! भारतात पहिल्या टप्प्यात 5G सेवा मुंबईसह पुण्यातही सुरू होणार, परंतु मंथली पॅक 40% पर्यंत महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 5G Spectrum Auction India | मार्च 2023 पासून भारतात इंटरनेटचा वेग 10 पट वाढेल. केंद्र सरकारने पुढील 20 वर्षांसाठी 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. मार्च 2023 पासून देशात 5G सेवा मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. दरम्यान, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की लोकांना 5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागतील ? जाणून घ्या. (5G Spectrum Auction India)

 

पहिल्या टप्प्यात देशातील 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट

5G सुरू करणार्‍या 3 टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया यांनी 5 जी वर काम सुरू केले आहे. या कंपन्यांनी चाचण्या केल्या आहेत. 5G इंटरनेट कोणत्या तारखेपासून सुरू होईल याचा अंतिम निर्णय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायला घ्यायचा आहे.

स्पेक्ट्रमचा लिलाव न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता, मात्र आता लिलावाला मंजुरी मिळाल्यानंतर 5G इंटरनेट सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. अहवालानुसार, पहिल्या टप्प्यात देशातील 13 शहरांमध्ये चंदीगड, दिल्ली, लखनऊ, गुरुग्राम, अहमदाबाद, जामनगर, कोलकाता, हैदराबाद, गांधीनगर, मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नईत 5 जी इंटरनेट सुरू होईल. (5G Spectrum Auction India)

 

61 देशांच्या ट्रेंडवरून समजते, भारतातील 5G डेटा पॅकची किंमत

तीन टेलिकॉम कंपन्या भारतात 5जी आणत आहेत – Jio, Airtel आणि Vi. यामध्ये, आतापर्यंत कोणत्याही कंपनीने आपल्या 5जी डेटा प्लानच्या किमतींबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे 5G चे दर नेमके किती असतील हे सांगणे कठीण आहे. जगातील ज्या देशांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे, त्या देशांमधून ट्रेंड नक्कीच समजू शकतो.

डिसेंबर 2018 मध्ये 5G सेवा सुरू करणारे दक्षिण कोरिया जगातील पहिला देश होता. यानंतर स्वित्झर्लंड, यूके आणि यूएसने देखील मे 2019 मध्ये 5G लाँच केले. आतापर्यंत 5G 61 हून अधिक देशांमध्ये सुरू झाले आहे.

 

5G प्लॅन 4G पेक्षा असेल 10 – 40% जास्त महाग

हे स्पष्ट आहे की जगातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या अनलिमिटेड 5G योजना 4 जी पेक्षा महाग आहेत.
कंपन्यांनी स्वत:हून 10% ते 40% वाढ केली आहे. भारतात जेव्हा 5 जी सेवा सुरू होईल, ते हा ट्रेंड दिसू शकतो.
म्हणजेच, भारतातही 5G प्लॅन 4G पेक्षा 10-40% जास्त महाग असू शकतो.

 

Web Title :- 5G Spectrum Auction India | 5g spectrum auction india net packs data plans

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा