स्मार्टफोनमध्ये 5G ची ‘एन्ट्री’ ! मिळणार 20 पट वेगानं ‘स्पीड’, फक्त 20 सेकंदामध्ये एक सिनेमा होईल ‘डाऊनलोड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   5G तंत्रज्ञान अद्याप भारतात आलेले नाही, परंतु स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी त्यांचे 5G मॉडेल्स लाँच केले आहेत. 4G आणि 5G मध्ये काय फरक आहे तसेच 4G च्या तुलनेत 5G चा स्पीड किती वेगवान होईल ते जाणून घेऊया…

जगातील स्मार्टफोन वापरणाऱ्यांविषयी सांगायचे झाले तर सप्टेंबर 2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये 85.11 कोटी, भारतात 34.59 कोटी, अमेरिकेत 26.02 कोटी, ब्राझीलमध्ये 9.68 कोटी, रशियामध्ये 9.53 कोटी वापरकर्ते आहेत.

जगातील तंत्रज्ञानाला 1 अब्ज आकडा गाठायला किती वर्षे लागली हे पाहिले जाऊ शकते. यात ऑनलाइन बँकिंगसाठी 41 वर्षे, स्मार्टफोनसाठी 19 वर्षे, इंटरनेटसाठी 16 वर्षे, 3G साठी 12 वर्षे, 4G साठी 12 वर्ष आणि 5G साठी 3.4 वर्ष (अंदाजे). अधिक माहिती म्हणजे 5G टेक्नॉलॉजी आपल्याला 4G च्या तुलनेत 20 पटीने जास्त वेगवान स्पीड देईल.

4G VS 5G बद्दल बोलायचे झाले तर सर्वात जास्त डेटा बँडविड्थसह 4G-1Gbps आणि 5G-10Gbps च्या गतीसह येईल. 4G वरून एक चित्रपट डाउनलोड करण्यास 6 मिनिटे लागतात, तर 5G ला किमान 20 सेकंदच लागतील.