लवकरच उपलब्ध होणार ‘5G’ सिम कार्ड ; असणार १ टीबी क्षमता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सर्वत्र ‘४जी’ चा बोलबाला असला तरी लवकरच ‘५ जी’ सिमकार्ड बाजारात येणार आहे. चीनमधील दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या चीन युनिकॉमने झिगुंग या समूहसोबत भागीदारी करीत ‘५ जी’ सिम कार्ड लॉन्च केले आहे. हे सिमकार्ड जगातील पहिलेच सिमकार्ड असल्याचा दावा चीनच्या कंपनीने केला आहे. या सिम कार्डचे विशेष म्हणजे त्याची क्षमता तब्बल १ टेट्राबाईट (१ टीबी) इतकी असणार आहे.

या सेवेमध्ये व्हिडिओ म्युझिक सारख्या मोठ्या फाईल्स स्टोअर करता येणे शक्‍य होणार आहे. हे सिम कार्ड वर्षअखेपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे सिम कार्ड एंटरप्राइज ग्रेड इन्स्क्रिपशन सिस्टीमनुसार असणार आहे. त्यामुळे युजर्सना अतिरिक्त डेटा प्रोटेक्शन मिळेल. हे सिम कार्ड नेमकं कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी चायना युनिकॉम कंपनी ५ जी नेटवर्क येत्या ऑक्टोबर महिण्यात लॉन्च करणार आहे. ५ ‘जी’ ची कनेक्टिव्हिटी असणाऱ्या फोन मध्ये सिमकार्डचा वापर करता येणार आहे. हे पहिले ५ जी सिमकार्ड आहे ज्यामध्ये ३२जीबी,६४जीबी,१२८ जीबी पर्यन्तची क्षमता उपलब्ध करून देणार आहेत. तसेच आगामी काळात या ‘५ जी’ सिमकार्डची स्टोअर क्षमता ५१२ जीबी आणि १ टीबी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.