कौतुकास्पद ! 5 वर्षाच्या मुलीनं बनवलं आश्चर्यकारक रेकॉर्ड, 13 मिनीटांमध्ये 111 ‘तीर’ पार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चेन्नईत राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलीने तिरंदाजीत जो विक्रम नोंदविला, तो अद्याप कोणत्या व्यावसायिक खेळाडूनेही बनविला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 5 वर्षांच्या संजनाने अवघ्या 13 मिनिटांत 111 बाण सोडले. संजना ही या जगातील एकमेव मुलगी आहे, जिने अवघ्या 13 मिनिटांत 111 बाण सोडले. एवढेच नव्हे तर या दरम्यान तिने हे काम 15 सेकंदांच्या अप-डाऊन स्थितीतही केले. आता हा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदविण्याची तयारी सुरू आहे.

पाच वर्षांच्या संजनाचे प्रशिक्षक शिहान हुसेन म्हणाले, “सर्वसाधारणपणे जगातील ट्रेंड आर्चर आणि कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 4 मिनिटांत 6 बाण चालवतात.” याचा अर्थ 20 मिनिटांत असे व्यावसायिक तिरंदाज 30 बाण मारण्यास सक्षम असतात, परंतु या मुलीने 13 मिनिटांत तब्बल 111 बाण सोडले.

ते म्हणाले, संजनाने एक अद्भुत विक्रम केला आहे. आम्ही या मान्यतेसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर पाठवू. प्रशिक्षक म्हणाले, संजनाला धनुर्विद्येत खूप आवड आहे आणि ती दहा वर्षांच्या वयापर्यंत स्वातंत्र्यदिनी नवनवीन रेकॉर्ड नोंदवेल. दहा वर्षाच्या वयानंतर संजनाला 2032 च्या ऑलिम्पिकसाठी तयार केले जाईल आणि ती गोल्ड मेडल आणेल, ज्यामुळे देशाला अभिमान वाटेल.