अबब ! इंदापूरमध्ये तब्बल 6.5 लाखाचा गांजा जप्त, ग्रामीण पोलिसांच्या ATS कडून दोघांना अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दहशतवाद विरोधी पथक पूणे ग्रामीण व इंदापूर पोलीस यांचे संयुक्त कारवाईत इंदापूर बाह्यवळण मार्गावरील डोंगराई सर्कलजवळ मंगळवार दिनांक 21 जुलै 2020 रोजी पहाटे 4:25 वा.चे सुमारास केलेल्या कारवाईत 6 लाख 55 हजार रूपयाच्या गांजासह दोन अरोपीना पोलीसांकडून अटक करण्यात आली असुन आरोपींना बारामती येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 27 जुलै पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दीले आहेत.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर व सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे हे शहरात पेट्रोलिंग करत असताना याच परीसरात दहशतवाद विरोधी पूणे ग्रामीण पथकाचे सहाय्यक फौजदार मोहिते व सहाय्यक फौजदार खरात हे त्यांचे स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना गुप्त खबर्‍यामार्फत खबर मीळाली की दोन इसम इंदापूर- सोलापूर हायवे रोडने दुचाकी मोटार सायकलवरून गांजाची चोरून रात्री तस्करी करीत पूणे बाजुकडुन सोलापूर बाजुकडे जाणार आहेत. अशी खबर मीळताच इंदापूर पोलीसांनी बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांना माहीती कळविली. सदर कारवाईसाठी नारायण शिरगावकर हे स्वत: उपस्थीत राहीले.

नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर बाह्यवळण येथील डोंगराई सर्कल येथे सापळा रचुन पोलीस थांबले असताना रात्रीचे वेळी दोन इसम संशयीत रीत्या,संशयीत माल घेवुन येताना पोलीसांना दीसले.त्यावेळी पोलीसांनी त्यांना जागेवरच पकडुन त्याची तपासणी केली असता त्यांचेकडे एकुण 32 किलो (6 लाख 55 हजार रूपये कीमतीचा) गांजा मीळुन आला.त्यांचे नाव पत्ता विचारले असता फिरोज हबीब शेख ( वय 40),रा. विसापूर,ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर
व विशाल रंगनाथ आढाव (वय 22) रा. रेवती-पाडळी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.

सदर इसमांना पोलीसांनी ताब्यात घेवुन अटक केली असुन त्यांना बारामती कोर्टात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दिनांक 27 जुलै पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दीले असुन याबाबतची फिर्याद दहशतवाद विरोधी पथक पूणे ग्रामीणचे सहाय्यक फौजदार अर्जुन हरीबा मोहीते यांनी इंदापूर पोलीसात दीली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पूणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मीलींद मोहिते, बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे हे करत आहेत.