खुशखबर ! केंद्र सरकारच्या विविध विभागात 6.83 लाख पदे रिक्त, लवकरच होणार भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या विविध विभागात जवळपास ६.८३ लाख पद रिकामी आहेत. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने बुधवारी लोकसभेत अशी माहिती दिली. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाला लेखी उत्तरात सांगितले की १ मार्च २०१८ पर्यंत एकूण ३८०२७७९ स्वीकृत पदांमधून ३११८९५६ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ६८३८२३ इतकी पदे रिक्त आहेत.

जितेंद्र सिंह म्हणाले की कामगारांची सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि बढती इत्यादीमुळे ही पदे रिक्त झाली आहेत. लवकरच संबंधित मंत्रालय यावर नियुक्त्या करणार आहे. तसेच ते म्हणाले की भरती ही एक अविरतपणे चालणारी प्रक्रिया असते. २०१९-२० दरम्यान तीन भरती एजन्सीजने यूपीएससी, एएससी आणि आरआरबीने सुमारे १.३४ लाख पदांवर नियुक्त्या करण्याची शिफारस केली आहे. यांमध्ये सर्वात जास्त ११६३९१ शिफारसी आरआरबी, १३९९५ एसएससी व ४३९९ यूपीएससीने शिफारशी केल्या आहेत.

कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात ३२० भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्त केले होते. त्यांनी एका लेखी उत्तरात सांगितले की ३० जानेवारी २०२० रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, गट अ चे १६३ अधिकारी आणि गट ब चे १५७ अधिकाऱ्यांच्या विरोधात जुलै २०१४ ते डिसेंबर २०१९ पर्यंत कारवाई करण्यात आली.