केंद्र सरकारच्या विभागांतील ६.८४ लाख पदे रिक्त, लवकरच होणार रिक्त पदांसाठी भरती

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वेगवगळ्या विभागांमध्ये साडे सहा लाखापेक्षा जास्त सरकारी पदे रिक्त आहेत. कार्मिक विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती संसदेत दिली. १ मार्च २०१८ पर्यंतच्या अहवालानुसार एकूण ३८.०२ लाख सरकारी पदांपैकी ३१. १८ लाख पदे भरली आहेत. रिक्त ६ लाख ८४,००० हजार जागांवर पुढील काही महिन्यात भरती केली जाईल.

या सर्व रिक्त जागा सेवानिवृत्ती, मृत्यू, पदौनोती या कारणामुळे निर्माण झाली आहे. या जागा संबंधित विभागाच्या नियमानुसार भरल्या जातील. जितेंद्र सिंह म्हणाले की, पुढील एका वर्षामध्ये १ लाख पेक्षा जास्त जागा भरण्याचे नियोजन आहे. याशिवाय त्यांनी रेल्वेमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक पदांवर भरती करण्याचा उल्लेख देखील केला आहे.

कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हंटले की, कर्मचाऱ्यांची निवड करणारा आयोग २०१९ आणि २०२० च्या दरम्यान वेगवेगळ्या विभागांतील १,०३,२६६ रिक्त पदांसाठी परीक्षेचे आयोजन करेल. देशातील वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून केले जात आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक