हिमस्खलनात १ जवानाचा मृत्यू, ५ जण बेपत्ता 

शिमला (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात सिनो-भारत सीमेजवळ हिमस्खलनाची घटना घडली आहे. या हिमस्खलनात एका जवानाचा मृतदेह मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनो-भारत सीमेजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे ६ जवानांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाचा मृतदेह आढळला आहे. तर इतर ५ जवान अद्याप बेपत्ता असल्याचे समजत आहे. या घटनेनंतर बचावकार्य सुरु आहे.
हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात सिनो-भारत सीमेजवळ घडेलली ही हिमस्खलनाची घटना शिपकाला येथील असून सकाळी ११ वाजता घडली आहे. इतकेच नाही तर, यात जम्मू- काश्मीर रायफल्ससह इंडो – तिबेटियन सीमा पोलिस दलातील अनेक जवान अडकले होते असेही समोर आले आहे. परंतु त्यांना वाचवण्यात मात्र यश आले आहे. दरम्यान बर्फाखाली गेलेल्या सहा जवानांपैकी एकाचा मृतदेह आढळला आहे. तर इतर पाच जवान अद्याप बेपत्ता असल्याचे समजत आहे. मुख्य म्हणजे ही घटना घडल्यानंतर प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु असल्याचे समजत आहे.

महत्वाच्या बातम्या –
किरण गित्ते यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यास केंद्राचा नकार 
आजपासून १२ वीच्या परीक्षेला सुरुवात, १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा