भोकर : डीजे वाजवणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल

भोकर: पोलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

मानाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या पाळज गावात व किनी येथे डीजे चा सरास वापर करणाऱ्या गणेश मंडळ व डीजे चालक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक भोकर पोलीस स्टेशनचे पूनम मोहनराव सूर्यवंशी या कर्तव्यावरअसताना काही डिजे चालक मालक यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम व अटी लक्षात न घेता गणेश विसर्जन मिरवणुकीत सरास पने डिजे लावण्यात आल्याने पी. एस. आय. पूनम सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सहा गुन्हे खालील आरोपीवर दाखल झाले व सर्व मुद्दे माल जप्त करण्यात आल्याचे पोलीसा कडून समजले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f34932e-c0b1-11e8-8d41-ff8d9237405c’]

आरोपी सुनील देवानंद,नरेश रेड्डी नरसा रेड्डी रा किनी,नाने गंगाधर जुकुलवाड रा पाळज,गणेश नरसय्या अवधुतवार,भोजना गंगाधर पळशीकर रा पाळज,संतोष नागनाथ पेंटेवाड,किशोर लक्ष्मण ठाणरावार,मारोती आडेलु,राजेश शंकरसिंह ठाकूर(नांदेड),साईनाथ नारायण तिपवाड(पाळज),अनिल बाबू गजगुलवाड,बालाजी पुंडलिक पेंटेवाड (तेलंगणा),गणेश रामलु अनमोड(पाळज),श्रीनिवास राजेश्वर महादावाड(पाळज),प्रसाद गंगाधर मार्गन,श्रीनिवास नरसय्या अवधूतवार,श्रीकांत साईनाथ आणेवाड इत्यादी आरोपी वर गुन्हे दाखल झाले असून यांना डीजे चा मुद्दे माल पोलीस स्टेशन येथे जमा केला आहेत सदरील आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा,पर्यावरण दूषित कायदा,भादवीच्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. जप्त मध्ये मोठे जनरेटर असलेले डीजे वापराचे व पुढील क्रमांकाची वाहने क्रमांक पिकअप टी एस ०४ यु ए ७६६७,ए पी २५ डब्लू ३०७१,ए पी ३७ व्ही ८३८३,एम एच २६ एच ९२८०,टी एस ०१ इ सी ३४९२,एम एच २६ ए डी ६१५२ह्या क्रमांकाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. फिर्यादी पूनम सूर्यवंशी(वय २९ वर्षे) यांनी दिल्यावरून भोकर पोलिसात गुन्हा दाखल झाला पुढील तपास जमादार आत्राम करत आहेत.

संवेदनशील घटनेत हिंजवडी पोलिसांचा हलगर्जीपणा
[amazon_link asins=’B077J5D76C,B07675R45Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69c1e844-c0b1-11e8-8400-2d165ef5215a’]