Healthy Food : 50 वर्षांच्या वयानंतर आवश्य खायला हव्यात ‘या’ 6 वस्तू, एक्सपर्टने सांगितले फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ब्रिटिश न्यूट्रिशन फाउंडेशनचे म्हणणे आहे की, 50 वर्षांच्या लोकांची मेटाबॉलिज्म सिस्टम 20 वर्षांच्या लोकांच्या तुलनेत खुप मंद असते. यासाठी, त्यांना फिट राहण्यासाठी खुप कमी कॅलरीची आवश्यकता असते. वाढत्या वयाच्या लोकांमध्ये हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, डायबिटीज आणि प्रोस्टेट कॅन्सरची समस्या सुद्धा वाढते. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या डाएटमध्ये काही खास गोष्टी सहभागी केल्याने आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

फॅटी फिश –

फॅटी फिश जसे की, साल्मनमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आढळते. हे अ‍ॅसिड इन्फ्लेमेशनची समस्या कमी करते, तसेच रक्तपेशींमध्ये पट्टिका वाढण्याच्या गतीला कमी करते. तसेच शरीरात गुड कॉलेस्ट्रोल वाढते आणि आतड्यांमध्ये इंफ्लेमेशनची समस्या कमी होते, ज्यामुळे आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टळतो.

अंडे –

वाढत्या वयासोबत व्यक्तीच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात. अंडे प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे, जे मसल रिकव्हर करण्याचे काम करते. अंड्यात शरीरासाठी व्हिटॅमिन-डी आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडसुद्धा असते. यामध्ये चोलीन नावाचे एक खास पोषकतत्व असते जे आपल्या जीन्सला रेग्युलेट करण्यास मदत करते.

एवोकाडो –

सध्या लोकांमध्ये कॉलेस्ट्रोलची समस्या खुपच वाढली आहे. ती नियंत्रित करण्यासाठी तुम्ही भरपूर एवोकाडोचा वापर करू शकता. हे ब्लड प्रेशरला कंट्रोल ठेवण्यासह हृदयरोगाची जोखिम कमी करण्यात उपयोगी आहे. वजन घटवणे आणि इन्फ्लेमेशनच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठीसुद्धा लाभदायक आहे.

ब्लूबेरी किंवा स्ट्रॉबेरी –

बेरीजला फायबरचा चांगला स्त्रोत मानले जाते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यातील अँटीऑक्सीडेंट्स पेशी डॅमेज होण्याची समस्या, स्किन, ब्लॅडर, फुफ्फड आणि घशात होणारा कॅन्सरच्या धोक्यापासून वाचवू शकते. हे सलाड किंवा यॉगर्टसोबत खाऊ शकता.

बदाम – अक्रोड

ज्येष्ठ लोकांसाठी बदाम-अक्रोड खुप आरोग्यदायी मानले जाते. हाडे मजबूत करणार्‍या बदाममध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट भरपूर असते. अक्रोडसुद्धा डाएट्री फायबरचा चांगला स्त्रोत आहे, ज्यामुळे फॅट कंट्रोल करणारे जीन्स अ‍ॅक्टिव्हेट होतात. आपल्या ब्रेन फंक्शनसाठी सुद्धा हे लाभदायक आहे. या वयाच्या लोकांनी रोज सुमारे 6 ते 10 बदाम आणि 3 ते 5 अक्रोड आवश्य खावेत.

बीट –

बीटमध्ये नायट्रेट नावाचे पोषकतत्व असते जे धैर्यशक्ती वाढवण्यासह ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. तसेत हृदय निरोगी ठेवते. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते जे ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासह शरीरातील मीठाची अतिरिक्त मात्रा बाहेर काढते.

डाएटशिवाय हे सुद्धा करा –

वयासोबत वाढते वजन कार्डियोव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका निर्माण करते. यासाठी डाएटसह फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी चांगली राहणे सुद्धा आवश्यक आहे. आपल्या फिजिकल स्ट्रेन्थला वाढवण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करा. दारू, सिगरेटपासून दूर रहा. बॉडी हायड्रेट ठेवा आणि रोज 7-8 तासांची चांगली झोप घ्या.