ठाकरे कॅबिनटेनं घेतले 6 महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार ‘या’ आरोग्य योजनेचा लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचं महाभयंकर संकट असून, महाराष्ट्रालाही सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वढत असल्यानं प्रशासनही हतबल झालं आहे. प्रशासनानं कोरोनाला थोपवण्यासाठी उपाययोजना राबवल्या असल्या तरी त्या तोडक्या पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून, काही निर्णय घतले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. जन आरोग्य योजनेच्या सर्व अंगीकृत रुग्णालयात याचा फायदा घेता येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हे निर्णय घतले आहेत.

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय
1. राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्त्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ
2. निसर्ग चक्रीवादळ – वादळाची तीव्रता लक्षात घेऊन किनारपट्टीवरील जिल्ह्यातील लोकांना आपअपल्या घरांतच थांबण्याचे आवाहन. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर
3. मुंबई उच्च न्यायालय विधि समिती व उपसमितीसाठी सचिव पदाच्या निर्मितीस मान्यता. मुंबईसह नागपूर आणि औरंगाबादसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन पदांची निर्मिती.
4. ठाणे येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन. न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस देखील मान्यता.
5. मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्तीबाबत
6. डीएमआयसी प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसी विकासक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like