Vastu : घरात झाडूचा वापर करताना करू नका ‘या’ 6 चूका, भरभराटीवर होईल वाईट परिणाम

नवी दिल्ली : घर किंवा ऑफिसमध्ये वापरण्यात येणार्‍या झाडूचे मोठे महत्व असते. यास लक्ष्मीचे प्रतीक सुद्धा मानले जाते. परंतु, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, झाडूमुळे घरात अनेकवेळा अशुभ गोष्टी घडू लागतात. वास्तुनुसार, जर झाडू मारताना सावधगिरी बाळगली नाही तर घरातील संपूर्ण भराभराट निघून जाईल.

नेहमी लोक झाडू तुटल्यानंतर सुद्धा त्याचा वापर करतात. वास्तुनुसार असे करणे खुप चुकीचे असते. झाडू एकदा तुटल्यानंतर त्याच्या काड्या पुन्हा जोडून वापरणे अशुभ असते.

ज्या कपाटात किंवा तिजारोत तुम्ही पैसे, दागिने किंवा किंमती सामान ठेवता, त्याच्या खाली किंवा बाजूला कधीही झाडू ठेवू नका. असे केल्याने व्यवसाय, संपत्तीवर वाईट परिणाम पडू लागतो.

घर किंवा ऑफिसमध्ये झाडू कधीही उभा करून ठेवू नका. या आवस्थेत झाडू खुप अपशकुनी मानला जातो. झाडू नेहमी जमीनीवर आडवा टाकून ठेवा. यामुळे तुमचा खिसा किंवा बँक बॅलन्स कधीही रिकामा होणार नाही.

सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या प्रहरात झाडू मारणे वास्तूच्या दृष्टीने अशुभ असते. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते. यासाठी सायंकाळी किंवा रात्रीच्यावेळी झाडू मारू नये. जर नाईलाजाने असे करावे लागले तर कमीत कमी कचरा बाहेर काढू नये. तो तुम्ही सकाळी बाहेर काढू शकता.

झाडूला पश्चिम दिशेच्या एखाद्या खोलीत ठेवणे खुप शुभ मानले जाते. या दिशेला झाडू ठेवल्याने कोणत्याही प्रकारची नाकरात्मक उर्जा राहात नाही.

झाडूला लक्ष्मीसमान मानले जाते. यासाठी नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीचा पाय झाडूला लागता कामा नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. असा अनादर झाल्याने घरात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.

जर तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये वापरला जाणारा झाडू बदलणार असाल तर यासाठी शनिवारचा दिवस खुप चांगला आहे. शनिवारी नवीन झाडू वापरात आणणे शुभ मानले जाते.