विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलिस आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत.

सध्या नांगरे-पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांची आता नाशिकच्या पोलिस आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. नांगरे-पाटील सन 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी लातूर, अहमदनगर आणि पुणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक म्हणुन कर्तव्य बजाविले आहे. पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी कार्यरत असताना त्यांनी सिंहगडच्या पायथ्याजवळ झालेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीण येथे कर्तव्य बजविल्यानंतर त्यांची मुंबईत पोलिस उपायुक्‍त म्हणुन बदली झाली. त्यानंतर त्याची पोलिस उप महानिरीक्षक म्हणुन पदोन्‍नती झाली. पोलिस उप महानिरीक्षक म्हणुन त्यांनी मुंबई, लाचुलचपत प्रतिबंधक विभागात काम केले. त्यानंतर त्यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली. औरंगाबाद आणि कोल्हापूर परिक्षेत्रात त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणुन काम पाहिले. आता त्यांची नाशिकच्या पोलिस आयुक्‍त पदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १० आईपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या 

IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक 

इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली 

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या 

राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या