रक्ताची कमतरता आणि यकृताचे विकार असणाऱ्यांसाठी गुणकारी ठरतं टोमॅटो ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे
पोलीसनामा ऑनलाईन टीम : टोमॅटोचा आहारात विविध प्रकारे समावेश केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का याच्या सेवनाचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. आज आपण याच फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
1) टोमॅटोमध्ये उष्मांकाचं प्रमाण तसंच कर्बोदकांचं प्रमाण अत्यंत कमी असतं. त्यामुळं रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या आजारात टोमॅटोचं सेवन गुणकारी ठरतं.
2) वजन कमी करायचं असेल तर आहारात टोमॅटोचं सेवन करावं. कारण यामुळं पोट भरल्याची भावना निर्माण होते. यात कमी उष्मांक असल्यानं वजन कमी होण्यास मदत होते.
3) टोमॅटोत अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं रातआंधळेपणा, दृष्टीदोष या विकारांवर टोमॅटो उपुयक्त आहे.
4) रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज 2 टोमॅटो खावेत. यामुळं रक्ताचं प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
5) यकृताचा विकार असल्यास टोमॅटोचं सेवन करावं.
6) मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचं सेवन नियमित करावं.
पुढील व्यक्तींनी टोमॅटोचं सेवन टाळावं
1) मुतखडा असणारे
2) संधीवाताची समस्या असणारे
3) आमवात आणि आम्लपित्त असणारे
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.